गडचिरोली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती शुक्रवार २५ डिसेंबरला सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ५१ अंपग व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, अनुसूचित जमाती माेर्चाचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजप शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर. जिल्हा महामंत्री सुधाकर येनगंदेलवार, न.प. सभापती आनंद श्रुंगारपवार, महिला माेर्चा महामंत्री वर्षा शेडमाके, शहर महामंत्री विनोद देवोजवार, जिल्हा सचिव अविनाश महाजन, अविनाश विश्रोजवार, प्रशांत भृगुवार, सागर कुमरे उपस्थित होते. सर्वप्रथम भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेसमोर खासदार अशोक नेते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर खा. अशोक नेते व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ५१ दिव्यांगांना ब्लॅंंकेटचे वाटप करण्यात आले.
५१ दिव्यांगांना ब्लॅंकेटचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:34 IST