शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

संघटनेद्वारेच दारूमुक्ती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:46 IST

गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी खूप प्रयत्नांनी मिळविली आहे. यासाठी मोठा लढा उभारावा लागला. आजही महिलांना दारूबंदी टिकविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. आपले ध्येय्य हे दारूमुक्ती आहे.

ठळक मुद्देराणी बंग यांचे प्रतिपादन : सिरोंचा येथे व्यसनमुक्ती संमेलन; ७२ गावातील कार्यकर्त्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी खूप प्रयत्नांनी मिळविली आहे. यासाठी मोठा लढा उभारावा लागला. आजही महिलांना दारूबंदी टिकविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. आपले ध्येय्य हे दारूमुक्ती आहे. आणि त्यासाठी महिला व पुरुषांनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी केले.सिरोंचा येथे मुक्तिपथद्वारे आयोजित व्यसनमुक्ती संमेलनात मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. तेलुगू भाषिक लोकांशी डॉ. राणी बंग यांनी तेलुगूतच साधलेला संवाद नवी प्रेरणा देऊन गेला. तालुक्यापासून दूरवर असलेल्या ७२ गावातील मुक्तिपथ गाव संघटनेचे ३२७ महिला व पुरुष कार्यकर्ते यावेळी हजर होते. याप्रसंगी मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सहायक पोलीस निरीक्षक पतंगराव पाटील, सुनंदा खोरगडे उपस्थित होत्या.अनेक महिलांनी यावेळी गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी दिलेला लढा सर्वांसमोर मांडला. पोलिसांनी दारूविक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी महिलांना आश्वासन दिले. दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील आहेत. महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.संमेलनात खर्रा सेवनाने होणारे दुष्परिणाम सांगणारा ‘यमराजाचा फास’ हा चित्रपट दाखविण्यात आला. भावी पिढी तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी जाऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आसरअल्ली जि. प. शाळेचे मुख्याध्यापक खुर्शीद शेख यांच्या ‘तंबाखूमुक्त पाठशाला’ या पुस्तकाचे विमोचन डॉ. राणी बंग यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.संचालन मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी केले. यशस्वीतेसाठी तालुका मुक्तिपथ संघटक सुनीता भगत, उपसंघटक महेंद्र सदनपू आणि प्रेरक संतोष चंदावार यांनी सहकार्य केले.आठवड्यात सोमवारी व्यसन उपचार क्लिनिकव्यसन हा आजार आहे. त्यावर उपचार शक्य असल्याने दारूची सवय सोडण्याची इच्छा असलेल्या व्यसनींवर उपचारासाठी सिरोंचा येथील मुक्तिपथ तालुका कार्यालयात १७ जूनपासून व्यसन उपचार क्लिनिक सुरू होत आहे. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी हे क्लिनिक राहणार असून येथे व्यसनींवर उपचार होणार आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी