शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित शिक्षक आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:38 IST

शिक्षक बदली प्रक्रियेत ४१० शिक्षकांना विस्थापित करण्यात आले आहे. आपल्यावर अन्याय झाला असून या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विस्थापित झालेल्या शिक्षकांनी दिला आहे.

ठळक मुद्देनव्याने प्रक्रिया राबवा : बदलीत प्रचंड घोळ झाल्याचा पत्रकार परिषदेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शिक्षक बदली प्रक्रियेत ४१० शिक्षकांना विस्थापित करण्यात आले आहे. आपल्यावर अन्याय झाला असून या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विस्थापित झालेल्या शिक्षकांनी दिला आहे.यावर्षी पहिल्यांदाच शिक्षकांची आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या बदली प्रक्रियेत जिल्ह्यातील जवळपास दोन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर सुमारे ४१० शिक्षक विस्थापित करण्यात आले आहेत. विस्थापित झालेल्या शिक्षकांमध्ये बहुतांश शिक्षक दुर्गम भागात आजपर्यंत सेवा देणारे व महिला शिक्षकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आता ज्या जागा रिक्त आहेत. यातील बहुतांश जागा महिला शिक्षकांसाठी प्रतिबंधीत असलेल्या जागा आहेत. विस्थापित झाल्यानंतर नाईलाजाने आता अर्ज करावा लागला आहे. दुर्गम भागात सेवा देताना शासन महिला शिक्षकांच्या सुरक्षिततेची हमी देणार काय? असा प्रश्न महिला शिक्षकांनी उपस्थित केला आहे. पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत ३० किमीच्या परिघात बदली न करता अनेक शिक्षकांना विस्थापित करण्यात आले आहे. पती, पत्नी एकत्रीकरणाचा अर्ज भरूनही दोघापैकी एकाची बदली झाली तर दुसऱ्यास विस्थापित करण्यात आले आहे. त्यामुळे कुटुंब विभागले जाणार आहे. ज्येष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ठ शिक्षकांना बदलीची संधी दिली आहे. महिलांसाठी संवर्ग ४ चे आवेदन भरताना नेमक्या रिक्त जागा दाखविल्याने पसंतीक्रम चुकले व ज्येष्ठ शिक्षकांना विस्थापित झाले. बदली यादी प्रकाशित न करता थेट बदल्या झाल्याने बदल्यांमधील घोळ वाढला आहे.मुलचेरा तालुक्यातील ३३ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. मात्र त्या ठिकाणी ६५ शिक्षक रूजू झाले आहेत. त्यामुळे जुने कार्यरत असलेले शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. बदली प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात घोळ झाला असून बहुतांश शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सदर बदली प्रक्रिया नव्याने राबविण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. अन्याय दूर करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला गंगाधर मडावी, साईनाथ अलोणे, कल्पना आकनुरवार, दिलीप मडावी, तुकाराम खोब्रागडे, रोशनी राखडे, इंदिरा चापले, कृष्णा पोवरे, वंदना ठवरे, प्रभाकर साखरे, सरीता पोरेटी, हेमंत साळवे, राजेंद्र भजभुजे, श्रीरंग नरोटे, सुवर्णा भडांगे, गायत्री चौधरी यांच्यासह शेकडो शिक्षक हजर होते.बोगस प्रमाणपत्रधारकांनी बळकावल्या जागासंवर्ग १ मध्ये आजारी कर्मचारी, अपंग कर्मचारी, हृदय शस्त्रक्रिया झालेले मूत्रपिंड, रोपण केलेले कॅन्सरग्रस्त, आजी-माजी सैनिक, विधवा, परितक्त्या, वयाची ८३ वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाºयांचा समावेश होतो. सर्व शिक्षकांचे चार संवर्ग पाडण्यात आले. त्यापैकी संवर्ग १ मध्ये मोडणाºया शिक्षकांना बदली करताना प्राधान्य देत त्यांच्या बदल्या सर्वप्रथम केल्या. काही शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र जोडले. त्यामुळे संवर्ग १ च्या शिक्षकांची संख्या वाढली. त्यांना प्रथम प्राधान्य असल्याने त्यांनी सुगम क्षेत्रातील जागा बळकावल्या. त्यानंतर संवर्ग २, संवर्ग ३ च्या बदल्या झाल्या. बहुतांश सुगम क्षेत्रातील जागा संवर्ग १ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांनी बळकावल्याने संवर्ग २ व ३ ला जागा शिल्लकच राहल्या नाही. परिणामी ज्यांच्या बदल्या झाल्या, त्यांना दुर्गम भागातील गावे मिळाली. तर काही जणांच्या बदल्याच न झाल्याने त्यांना विस्थापित व्हावे लागले. विशेष म्हणजे, संवर्ग १ मध्ये मोडत असलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची चौकशी होणे आवश्यक होते. काही जिल्ह्यांनी ही प्रक्रिया राबविली. यात अनेक बोगस प्रमाणपत्र आढळून आले. संबंधित जिल्ह्यांनी त्या शिक्षकांवर कारवाई सुध्दा केली. मात्र गडचिरोली जिल्हा परिषद प्रशासनाने बोगस प्रमाणपत्रांची चौकशी केली नाही. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी समिती नेमून प्रमाणपत्रांची चौकशी करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शिक्षकांनी केली आहे.संवर्गनिहाय यादी जाहीर कराबदली प्रक्रियेच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार बदली प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणे आवश्यक होते. संवर्ग १ ची बदली पहिल्यांदा झाली असती तर बोगस प्रमाणपत्रधारक लक्षात आले असते. मात्र तिन्ही संवर्गाची बदली एकाच वेळी झाली आहे. त्यामुळे कोणाची बदली कोणत्या संवर्गातून झाली आहे, हे कळण्यास मार्ग नाही. त्यामुळे बदलीच्या घोळात बोगस प्रमाणपत्रधारकांचे घोडे न्हाले आहे. ते चुपचाप आहेत. बदली प्रक्रियेत पारदर्शकता ठेवायची असेल तर संवर्गनिहाय बदलीची यादी जाहीर करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शिक्षकांनी केली.

टॅग्स :Teacherशिक्षक