शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित गुरूजींची दुर्गम भागात नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:14 IST

बदलीची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हाभरातील ४१० शिक्षक विस्थापित झाले होते. पाचव्या फेरीत व रॅडम राऊंड घेऊन त्यांची बदली करण्यात आली. यातील ९० टक्केपेक्षा अधिक शिक्षकांना दुर्गम व नक्षलग्रस्त भागातीलच शाळा मिळाल्या आहेत.

ठळक मुद्देबदली प्रक्रिया पूर्ण : एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, धानोरा, कोरची तालुक्यातील मिळाल्या शाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बदलीची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हाभरातील ४१० शिक्षक विस्थापित झाले होते. पाचव्या फेरीत व रॅडम राऊंड घेऊन त्यांची बदली करण्यात आली. यातील ९० टक्केपेक्षा अधिक शिक्षकांना दुर्गम व नक्षलग्रस्त भागातीलच शाळा मिळाल्या आहेत.जिल्हा परिषदेत होणारा बदल्यांचा घोळ संपविण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच शासनाने पुणे येथून शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या केल्या. या बदल्यांबाबत काही शिक्षक समाधानी आहेत. तर काही शिक्षक मात्र अन्याय झाल्याचे बोलत आहेत. मे महिन्यात जवळपास दोन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या. ज्या शिक्षकांनी २० शाळा निवडल्या होत्या, त्यापैकी एकही शाळा न मिळालेल्या शिक्षकांना विस्थापित घोषीत करण्यात आले. या शिक्षकांची बदली करण्यासाठी ११ जून रोजी पाचवी फेरी राबविण्यात आली. तर यातूनही शिल्लक असलेल्या १०८ शिक्षकांसाठी रँडम राऊंड १५ जून रोजी झाला. यातील बहुतांश शिक्षकांना भामरागड, कोरची, सिरोंचा, एटापल्ली, धानोरा तालुक्यातील दुर्गम भागातीलच शाळा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, विस्थापित झालेल्यांपैकी काही शिक्षक यापूर्वीही दुर्गम भागातच सेवा देत होते. तरीही त्यांची बदली दुर्गम भागातच झाली असल्याने सदर शिक्षक आपल्यावर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. यासाठी लढा देण्याचा निर्धार शिक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. तोपर्यंत मात्र बदली झालेल्या ठिकाणी रूजू व्हावेच लागणार आहे.यादीसाठी माहितीचा अधिकारबदली झालेल्या शिक्षकांची यादी संवर्गनिहाय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माहितीच्या अधिकारांतर्गत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. शिक्षण विभागानेही याला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित गट शिक्षणाधिकाºयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती द्यावी, असे निर्देश दिले आहेत. ही यादी उपलब्ध झाल्यानंतर बोगस माहितीच्या आधारे बदली झालेल्यांचा भंडाफोड होणार आहे.प्रमाणपत्रांची तपासणी सुरूचसंवर्ग १ व संवर्ग २ मधून ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, त्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत केली जात आहे. सदर प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली होती. ती प्रक्रिया अजुनही सुरूच आहे. त्यामुळे नेमक्या किती शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस आढळले, हे अजूनपर्यंत कळले नाही. गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत होणाºया प्रमाणपत्रांच्या तपासणीवर काही शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. काही शिक्षकांनी प्रकृतीचे कारण दाखवून संवर्ग १ मधून बदलीचा लाभ उचलला आहे. मात्र वैद्यकीय प्रमाणपत्र गट शिक्षणाधिकाºयांना समजणार नाही. यासाठी जबाबदार वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सदर प्रमाणपत्रांची तपासणी करून घ्यावी. त्यानंतरच संबंधित शिक्षकाचे प्रमाणपत्र योग्य आहे किंवा नाही, याबाबतचा निर्णय घ्यावा. दोषी आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.च्इतर जिल्ह्यांमध्ये प्रमाणपत्र तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ उचलला आहे, अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचीही तयारी संबंधित जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरू केली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे अजूनपर्यंत अहवालच उपलब्ध झाला नाही. तपासणीची प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली