शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कंवर समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:16 IST

महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कंवर समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने स्थानिक किसान मंगल कार्यालयात दोन दिवसीय एकता प्रबोधन मेळावा घेण्यात आला.

ठळक मुद्देकुरखेडा येथे एकता प्रबोधन मेळावा : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : महाराष्ट्र  प्रदेश आदिवासी कंवर समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने स्थानिक किसान मंगल कार्यालयात दोन दिवसीय एकता प्रबोधन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यादरम्यान समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. मेळाव्यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.मेळाव्याचे उद्घाटन कुरखेडा पंचायत समितीचे सभापती गिरीधारी तितराम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी कंवर समाजाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. मेघराज कपूर होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक भरतसिंग दुधनाग, केंद्रप्रमुख विजय बन्सोड, गणेश फुलकवर, कुरखेडा नगर पंचायतीच्या उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, हरीशचंद्र पेंकरा, अनिल केरामी, पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी, पीएसआय शिवप्रसाद कराडे, सुनेर सोनटापर, भिकम फुलकवर, अंबिका बंजार, जितेंद्र चंद्रबंशी, धर्मदास उईके, कुमारीबाई जमकातन, लघुन कार्यपाल, माजी सभापती अवधराम बागमुळ, रेखा ब्रह्मणायक, विनोद मडकाम, गिरीधर मेश्राम, प्रगुलास शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. मेघराज कपूर यांनी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कर्मचारी बांधवांनी एकत्र येऊन समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेतले. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. सध्याची शैक्षणिक स्थिती, बेरोजगारी, शासन सुविधा, शेतकºयांसमोरील आव्हाने यावर प्रकाश टाकला. जवळपास ५ हजार बोगस प्रमाणपत्रांच्या आधारावर गैरआदिवासींनी नोकºया बळकावल्या आहेत. मूळ आदिवासी मात्र आपल्या अस्तित्वासाठी धडपड करीत आहे. खºया आदिवासींना जाचक अटी लादून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपले स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवायचे असेल तर सांस्कृतिक ठेवा जोपासण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी सभापती गिरीधारी तितराम, भरतसिंग दुधनाग, प्रभाकर तुलावी, जयश्री धाबेकर, विजय बन्सोड, कुमारीबाई जमकातन यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रा. गणेश सोनकलंगी, गुलाब सोनकुकरा, नीलकंठ बख्खर, परमानंद पुजेरी, संतराम धिकोंडी, सोनुराम कपूर, गणेश सोनवानी, महानू हुंडरा, हेमराज कुवर, चेतानंद जमकातन, मदन बागडेरिया, राधेश्याम फुलकुवर, अनिता चावर, धनंजय कुवर यांनी सहकार्य केले. या मेळाव्याला जिल्हाभरातील हजारो कंवर समाजाचे नागरिक, महिला व विद्यार्थी, युवक उपस्थित होते.गौरा-गौरी कलशयात्रामेळाव्यानिमित्त कुरखेडा येथून पारंपरिक वेशभुषेतील कंवर समाजाच्या महिलांनी गौरा-गौरी कलशयात्रा काढली. रेला नृत्य, मंडई यांची रॅली काढण्यात आली. राष्टÑपती पोलीस पदत विजेता गजेंद्र सोंनजाल, संगीता जमकातन यांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.