वैरागड : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस संघटना तालुका शाखा आरमोरीची वार्षिक सभा २६ मार्च रोजी वैरागड येथील समाज मंदिराच्या सभागृहात पार पडली. या सभेदरम्यान पोलीस पाटलांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष नरेंद्र बनपुरकर होते. यावेळी जिल्हाध्यक्ष हरिहर खरकाटे, तालुका सचिव किशोर हुलके, सहसचिव गोरकनाथ भानारकर, कोषाध्यक्ष मुकरू राऊत, संघटक लोकनाथ उईके, संचालक बळीराम नाकाडे, मुरारी दहीकर, अन्नाजी निकुरे, शकुंतला पत्रे, लालाजी दुधबळे, ममिता म्हशाखेत्री, सागर खेवले आदी उपस्थित होते. पोलीस पाटील पदाचे दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागते. हा कालावधी १० वर्षांचा करण्यात यावा, मानधनामध्ये वाढ करावी, पोलीस पाटलांना असलेल्या अधिकारात वाढ केल्यास गावामध्ये शांतता व सुव्यवस्था ठेवण्यास आणखी मदत होईल, असा एकमताने ठराव सभेदरम्यान घेण्यात आला. त्याचबरोबर संघटनेकडे असलेल्या जमा खर्चाचाही हिशोब करण्यात आला. पोलीस पाटलांच्या समस्यांबाबत शासन दरबारी लढा देण्याचे संघटनेच्या बैठकीत ठरविण्यात आले. संचालन व आभार गोरकनाथ भानारकर यांनी मानले.
पोलीस पाटलांच्या समस्यांवर चर्चा
By admin | Updated: March 29, 2016 02:45 IST