शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मन्नेराजाराम ग्रामसभेत तेंदू हंगामाबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:22 IST

तालुक्यातील मन्नेराजाराम येथे ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत तेंदूपत्त्याच्या हंगामाबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षीच्या तेंदू हंगामासाठी बेलकटाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पं.स. सदस्य इंदरशहा मडावी उपस्थित होते.

ठळक मुद्देबेलकटाई होणार : ठेकेदारांनी लिलावात सहभाग न घेतल्याने नागरिकांमध्ये संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील मन्नेराजाराम येथे ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत तेंदूपत्त्याच्या हंगामाबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षीच्या तेंदू हंगामासाठी बेलकटाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पं.स. सदस्य इंदरशहा मडावी उपस्थित होते.ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून प्रभाकर मडावी, गोटुल समितीचे अध्यक्ष रामय्या सडमेक यांच्यासह सर्व पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. यावर्षी तेंदूपत्त्याचे चांगले उत्पादन व्हावे, यासाठी बेलकटाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेंदूपत्त्याच्या लिलावाची प्रक्रिया ग्रामसभेने सुरू केली. मात्र लिलावात ठेकेदारांनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे काही गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. तेंदूपत्त्याचा लिलाव जरी उशीरा होणार असला तरी तेंदूपत्ता अधिक प्रमाणात व्हावा, यासाठी पूर्व नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने गावकऱ्यांनी सोमवारपासून बेलकटाई करण्याचा निर्णय घेतला. उत्तम दर्जाचा तेंदूपत्ता येण्यासाठी बेलकटाई होणे आवश्यक आहे, अशी माहिती इंदरशहा मडावी यांनी दिली.मागील वर्षी तेंदूपत्त्याला अत्यंत कमी प्रमाणात भाव मिळाला होता. तालुक्यातील काही गावांमधील तेंदूपत्ता खरेदी करण्यासाठी ठेकेदारांनी सहभागच घेतला नव्हता. त्यामुळे अनेक गावांचे लिलाव झाले नाही. तेंदूपत्ता चांगला असतानाही त्याची तोड झाली नाही. परिणामी ग्रामसभेला रॉयल्टीवर पाणी सोडावे लागले. तसेच गावातील मजुरांचाही रोजगार बुडाला होता. ही परिस्थिती यावर्षी येऊ नये, यासाठी बºयाच ग्रामसभा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :forestजंगल