शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:23 IST

आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी तसेच आपत्तीतून बचाव करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची आहे. भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, अपघात, आग लागणे अशा विविध आपत्तीचे प्रमाण वाढले .....

ठळक मुद्देआरमोरीत शिबिर : गोंडवाना विद्यापीठस्तरीय कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतआरमोरी : आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी तसेच आपत्तीतून बचाव करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची आहे. भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, अपघात, आग लागणे अशा विविध आपत्तीचे प्रमाण वाढले असून अशा नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणे गरजेचे आहे. शिवाय यातून उत्तम स्वयंसेवक निर्माण व्हावे, या उद्देशाने स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठस्तरीय दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार यशवंत धाईत, सहायक पोलीस निरीक्षक महारूद्र परजने, प्राचार्य विनोद धारगावे, संदीप लांजेवार, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. ज्ञानेश्वर ठाकरे, डॉ. उत्तमचंद मुंगमोडे उपस्थित होते.दोन दिवस चाललेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती शिबिरात प्रशिक्षक म्हणून मॅनेजर आॅपरेटर मार्केटिंग असोसिएट्स नागपूरचे मोझेश कोंडरा, रेड क्रॉस ट्रेनर अविनाश चडगुलवार उपस्थित होते. कोंडरा यांनी आगीमुळे कशाप्रकारे बचाव करता येईल याची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. तसेच भूकंप, पूर, ढगफुटी, वादळ, विजा, आग, वायूगळती, भूस्खलन, अपघात, फ्रॅक्चर, भाजणे, विंचू चावणे, साप चावणे अशा विविध नैसर्गिक आपत्तींना सामोरे कसे जाता येईल याची चित्रफितीद्वारे माहिती दिली. चडगुलवार यांनी प्राथमिक उपचार पद्धती सांगितली. प्रास्ताविक उत्तमचंद कांबळे, संचालन विजय रैवतकर तर आभार ज्ञानेश्वर ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. सीमा नागदेवे, गजेंद्र कढव, अमिता बन्नोरे, चंद्रकांत डोर्लीकर, दिलीप घोनमोडे, सतेंद्र सोनटक्के, विजय गोरडे, स्नेहा मोहुर्ले, गजानन बोरकर, दयाराम मेश्राम, बाबुराव शेंडे, रमेश इंकणे, खुशाल रामटेके, प्रशांत दडमल, सचिन ठाकरे यांनी सहकार्य कले.