लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुरखळा केंद्राअंतर्गत येणाºया शाळांमधील २ हजार २५० विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची गुरूवारी परीक्षा घेण्यात आली.मुरखळा केंद्रातील खासगी व जिल्हा परिषदेच्या २३ शाळांनी सहभाग घेतला. पहिल्या गटात पाचवी ते आठव्या वर्गात समावेश होता. या गटाच्या १ हजार २९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुसºया गटात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या गटाच्या १ हजार २२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार यांच्या मार्गदर्शनात सदर परीक्षा घेण्यात आली. नैसर्गिक किंवा कृत्रिम आपत्ती निर्माण झाल्यास त्यातून विद्यार्थ्यांना बाहेर पडता यावे, त्याचबरोबर इतरांची मदत करता यावी, या उद्देशाने सदर परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षा यशस्वी करण्यासाठी मुरखळा केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षकांनी सहकार्य केले आहे. जिल्हाधिकाºयांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:48 IST
मुरखळा केंद्राअंतर्गत येणाºया शाळांमधील २ हजार २५० विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची गुरूवारी परीक्षा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
ठळक मुद्देमुरखळा केंद्राचा उपक्रम : २ हजार २५० विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा