शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना व्यवसायासाठी मिळणार मोफत 'व्हेइकल'; लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:13 IST

Gadchiroli : सर्वसामान्यांप्रमाणे दिव्यांगांना कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाअंतर्गत हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाइल ऑन ई-व्हेइकल) मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे १० जून २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. सदर योजनेंतर्गत दिव्यांगांना रोजगारनिर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, हा उद्देश आहे. २.२५ लाख रुपयांचे मोबाईल व्हेइकल या योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

अर्ज भरण्यासाठी ६ फेब्रुवारीची अंतिम मुदतयोजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणीची प्रक्रिया २२ जानेवारीपासून करण्यात आली असून, दिव्यांग व्यांग व्यक्तींकडून ६ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.

पोर्टलवर सुविधादिव्यांगांना फिरते वाहन योजनेचा लाभ घेण्यासाठी https://register.mshfdc.co.in या लिंकवर अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. सदर लिंकवर क्लिक केल्यानंतर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे पोर्टल उघडले जाते. त्यानंतर अर्ज भरण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. 

अशा आहेत अटी, शर्थी

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, जिल्हा शल्यचिकित्सक किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले किमान ४०% दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र असावे, अर्जदार १ जानेवारी २०२४ या दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५या वयोगटातील असावा.
  • मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत पालक अर्ज करण्यास सक्षम असतील, दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख पेक्षा अधिक नसावे, अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नाकारल्यास परवानाधारक नसलेल्या अतितीव्र व्दिव्यांगाच्या सोबतच्या सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली