शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

विलगीकरण कक्षात सर्वत्र घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

एटापल्ली येथील विविध शासकीय इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात परतलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दोन्ही इमारतींमध्ये सध्या सहा महिला व २० पुरूष आहेत. मात्र आयटीआयमधील विलगीकरण कक्षात स्वच्छतेचा अभाव आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला कळविले. परंतु काहीच उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देस्वच्छतेकडे दुर्लक्ष : एटापल्लीच्या आयटीआयमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : परजिल्हा व राज्यातून परतलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. मात्र एटापल्ली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात नागरिकांसाठी योग्य सोयी, सुविधा नाहीत. त्यातच विलगीकरण कक्षाला घाणीचा विळखा आहे. अनेक खोल्यांमध्ये घाण असून दुर्गंधी येत आहे. तसेच शौचालयसुद्धा दुर्गंधीयुक्त असतानाही येथे नागरिकांना राहावे लागत आहे. मात्र या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.एटापल्ली येथील विविध शासकीय इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात परतलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दोन्ही इमारतींमध्ये सध्या सहा महिला व २० पुरूष आहेत. मात्र आयटीआयमधील विलगीकरण कक्षात स्वच्छतेचा अभाव आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला कळविले. परंतु काहीच उपयोग झाला नाही. परिणामी दुर्गंधीतच नागरिकांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करावा लागत आहे. येथील स्वच्छता नियमित केली जात नाही. सफाईगार आल्यास बाहेरूनच झाडू मारून निघून जातात. येथील शौचालय, बाथरूम, बेसिनमध्ये घाण आहे. त्यामुळे टाकलेले पाणी झिरपत नाही. फरश्यांचीसुद्धा साफसफाई करून पुसल्या जात नाही.विशेष म्हणजे, अनेक प्रवाशांना एकच शौचालय व बाथरूमचा वापर करावा लागत आहे. वेगवेगळी व्यवस्था नसल्याने बाधित रूग्ण आढळल्यास सर्वांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विविध कारणांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्ष वादग्रस्त ठरले आहे. काही नागरिकांनी येथील अस्वच्छतेचे फोटो मोबाईलद्वारे काढून नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग यांना पाठविले. तसेच समाज माध्यमांवरसुद्धा झळकले. तेव्हा तेलंग यांनी विलगीकरण कक्षाला भेट देऊन पाहणी करीत संबंधित कर्मचाऱ्यांना स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही. विलगीकरण कक्षाला अद्यापही घाणीचा विळखा आहे.विशेष म्हणजे, १३ जून २०२० ला येथे ठेवण्यात आलेल्या दोघांनी पळ काढला होता. मात्र एक जण अध्या तासातच परतला. तर दुसरा पहाटेच्या सुमारास परत आला. एवढी मोठी घटना घडूनही याबाबत कोणत्याही व्यक्तीने बाहेर वाच्यता केली नाही.नागरिकांच्या अनेक तक्रारीविलगीकरण कक्षातील असुविधांमुळे १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने अनेकांनी या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. परंतु त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. येथील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात नाही. तसेच नागपूर रेड झोनमधून आलेल्या काही लोकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले तर काही लोकांना गृह विलगीकरणात करण्यात आले. अशा प्रकारचा दुजाभाव का करण्यात आला, असा सवालही नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, येथील नागरिकांना योग्य प्रकारे मिळत नाही. केवळ वरणभात व पोळी वारंवार भोजनात दिली जात असल्याचीसुद्धा तक्रार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या