शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

४००० ग्राहकांना डिजीटल वीज मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महावितरणने जुने व नादुरूस्त मीटर बदलवून देण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील ...

ठळक मुद्देमहावितरणची विशेष मोहीम : नादुरूस्त मीटरही बदलविणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महावितरणने जुने व नादुरूस्त मीटर बदलवून देण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील १० महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३ हजार ५७६ ग्राहकांना नवीन डिजीटल वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अजून काही ग्राहकांना नवीन मीटर देण्याचे काम सुरू आहे.वीज ही प्रत्येक कुटुंबाची अत्यावश्यक गरज झाली आहे. मात्र वाढत्या वीज बिलामुळे नागरिक तेवढेच त्रस्त सुद्धा आहेत. वीज बिलाची रक्कम ठरविण्याचे महत्त्वाचे यंत्र म्हणजे वीज मीटर आहे. वीज मीटरमध्ये बिघाड असल्यास कधीकधी आवश्यकतेपेक्षा अधिकचे वीज बिल येते. अशावेळी ग्राहकांकडून ओरड सुरू होते. तसेच महावितरणवरील नागरिकांचा विश्वासही उडायला लागतो. त्यामुळे ग्राहकांकडून जेवढा वीज वापर तेवढेच वीज बिल त्याला यावा, यादृष्टीने महावितरण प्रयत्न करीत आहे.जुने तंत्रज्ञान असलेले मीटर बदलून त्याऐवजी डिजिटल मीटर लावले जात आहेत. मागील वर्षभरापासून महावितरणने मीटर बदलवून देण्याची मोहीम सुरू केली आहे. वीज मीटर नादुरूस्त असल्याची तक्रार संबंधित ग्राहकाकडून प्राप्त झाल्यानंतर नवीन डिजिटल मीटर बसवून दिले जात आहे. जुन्या चक्रीयुक्त मीटरमध्ये सहज छेडछाड करता येत होती. त्यामुळे विजेची चोरी मोठ्या प्रमाणात होत होती. ही बाब महावितरणच्या लक्षात आल्यानंतर आता महावितरण स्वत: पुढाकार घेऊन चक्रीयुक्त मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन डिजिटल मीटर लावले जात आहेत.अचूक रिडिंगवर महावितरणचा भरउन्हाळा सुरू झाल्यानंतर विजेचा वापर वाढणार आहे. वीज वापर वाढल्याने जास्तीचे वीज बिल येणे साहजिक आहे. मात्र एखाद्या ग्राहकाच्या वीज मीटरमध्ये बिघाड असल्यास त्याला चुकीने मोठ्या रकमेचे बिल येते. अशावेळी संबंधित ग्राहक आश्चर्यचकीत होतो व ही बाब सभोवतालच्या १० व्यक्तींना सांगतो. त्यामुळे महावितरणची प्रतिमा मलीन होते. प्रत्येक ग्राहकाला त्याच्या वीज वापरानुसार वीज बिल उपलब्ध व्हावे, यासाठी वीज मीटर बदलविले जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रत्येक मीटरचे काटेकोर रिडिंग होईल, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :electricityवीजdigitalडिजिटल