लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : बँक कार्यालयात सतत लिंक फेल असल्यामुळे आर्थिक ऑनलाईन व्यवहार करण्याची गती अत्यंत मंदावली आहे. परिणामी ग्राहकांना रांगेत उभे राहून तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. ही बाब लक्षात स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँकेसमोर ग्राहकांसाठी मंडपाची व्यवस्था केली. बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वऱ्हांड्यात ग्राहक उन्हामध्ये उभे राहत होते. उन्हापासूून ग्राहकांचा बचाव व्हावा तसेच कोरोनाच्या संचारबंदीत सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने नगर पंचायत प्रशासनाने वऱ्हांड्यात हिरवी मॅट बांधली तसेच त्यासमोरील भागात मंडप टाकला.या वऱ्हांड्यात व मंडपामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून ग्राहक बँकेच्या कामासाठी उभे राहत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन केल्यामुळे पंतप्रधानांनी गोरगरीब जनतेसाठी मोफत अन्नधान्य वितरण तसेच जनधन बँक खात्यात दरमहा ५०० रुपये आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या सिलिंडरसाठी दरमहा ७८२ रुपयांचे अनुदान जमा करणे सुरू केले आहे. सदर अनुदानाचे पैसे खात्यातून काढण्यासाठी हजारो ग्राहक जिल्हा मध्यवर्ती सहकारी व विदर्भ कोकण बँकेत गर्दी करीत आहेत.कोरोनाबाबत प्रशासनाकडून खबरदारीकोरची येथे दर गुरूवारी मोठा आठवडी बाजार भरतो. मात्र आता संचारबंदीमुळे हा बाजार बंद आहे. भाजीपाला विक्रेत्यांसाठी नगर पंचायतने विशिष्ट जागा ठरवून दिली आहे. या ठिकाणी बांबूचे कठडे लावून भाजीबाजार भरविला जात आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नगराध्यक्ष ज्योती नैताम, मुख्याधिकारी विजय देवरीकर, कोरची पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले यांच्या नेतृत्वात उपाययोजना करून खबरदारी घेतली जात आहे. गोडबोले यांच्या नेतृत्वात मुख्य व सर्वच चौकात पोलिसांच्या मदतीने संचारबंदीचे पालन केले जात आहे. जनजागृतीसोबतच सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले जात आहे.
लिंक फेलमुळे आर्थिक व्यवहारात अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST
वऱ्हांड्यात व मंडपामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून ग्राहक बँकेच्या कामासाठी उभे राहत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन केल्यामुळे पंतप्रधानांनी गोरगरीब जनतेसाठी मोफत अन्नधान्य वितरण तसेच जनधन बँक खात्यात दरमहा ५०० रुपये आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या सिलिंडरसाठी दरमहा ७८२ रुपयांचे अनुदान जमा करणे सुरू केले आहे.
लिंक फेलमुळे आर्थिक व्यवहारात अडचण
ठळक मुद्देबँकांसमोर ग्राहकांची गर्दी : नगर पंचायत प्रशासनाकडून मंडपाची व्यवस्था; टोकन व्यवस्थेमुळे गर्दीला आळा