शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठेंगण्या पुलाने वाट अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:05 IST

सिरोंचा तालुक्यातील पातागुडम परिसरातील सोमनपल्ली नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी राहत असल्याने परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून आसरअल्ली हे गाव गाठावे लागते. या नाल्यामुळे परिसरातील सुमारे १० गावांचा संपर्क तुटतो.

ठळक मुद्देसोमनपल्ली नाल्याच्या पुलावर चढते पाणी । डोंग्याने करावा लागतो धोकादायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील पातागुडम परिसरातील सोमनपल्ली नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी राहत असल्याने परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून आसरअल्ली हे गाव गाठावे लागते. या नाल्यामुळे परिसरातील सुमारे १० गावांचा संपर्क तुटतो.पातागुडम परिसरात सोमनपल्ली, कोपेल्ला, कोर्लामाल, रमेशगुडम, देचलीपेठा, झिंगानूर, पातागुडम, रायगुडम व पेंड्याला या दहा गावाच समावेश होतो. या परिसरातील आसरअल्ली हे सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे भाजीपाला, किराणा खरेदी करायचा असेल तर आसरअल्लीला गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. सिरोंचा हे तालुका मुख्यालय या गावांपासून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे अनेकांनी तर तालुकास्थळ सुध्दा बघितला नाही. अशी या भागातील नागरिकांची विपरित स्थिती आहे. पातागुडम ते सिरोंचा दरम्यान मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरील जवळपास सर्वच नाल्यांवरील पुलांची उंची वाढविण्यात आली आहे. मात्र सोमनपल्ली नाल्यावरील ठेंगणा पूल अजुनही कायम आहे. हा परिसर जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे थोडाही पाऊस पडला तरी नाला ओसंडून वाहण्यास सुरूवात होते. मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सोमनपल्ली नाल्यावरून सतत १५ दिवस पाणी वाहत होते. त्यामुळे या संपूर्ण गावांचा संपर्क तुटला होता. नाल्यावरील पुलावरून पाच फुटापेक्षा अधिक पाणी होते. या पाण्यातूनही काही नागरिक मार्ग काढत होते.पूर परिस्थितीत या परिसरातील नागरिकांना डोंग्याने प्रवास करावा लागतो. मात्र हा प्रवास अतिशय धोकादायक राहतो.दीड महिन्यांपासून वीज पुरवठा खंडितसिरोंचा तालुकास्थळापासून सुमारे ५५ किमी अंतरावर असलेला पातागुडमचा परिसर जंगलाने व्यापला आहे. जंगलातून वीज तारा टाकल्या असल्याने पावसाळ्यात वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. ही बाब येथील नागरिकही मान्य करतात. मात्र एकदा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर तो दुरूस्त करण्यासाठी येथील महावितरणचे कर्मचारी कोणतीच कार्यवाही करीत नाही. त्यामुळेच या परिसरातील वीज पुरवठा मागील दीड महिन्यांपासून खंडीत झाला आहे. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक कोणतीही तक्रार करीत नाही. याचा गैरफायदा या परिसरातील वीज कर्मचारी घेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.अनेकांनी बघितले नाही तालुकास्थळसिरोंचा हे तालुकास्थळ पातागुडमपासून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे. या परिसरातील गावे जंगलाने व्यापली आहेत. सिरोंचाला जायचे असेल तर सर्वप्रथम आसरअल्ली गाठावे लागते. आसरअल्लीपर्यंत जाण्यासाठी वाहने उपलब्ध नाहीत. त्यामुळे विशेष करून अनेक महिलांनी सिरोंचा हे तालुकास्थळ सुध्दा अजूनपर्यंत बघितले नाही. जिल्हास्थळ तर फार दूर आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर