शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलचे भाव उतरले, काय स्वस्त झाले रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

डिझेलचे भाव वाढल्यास निर्मितीचा खर्च वाढतो तसेच वाहतुकीच्या खर्चात भर पडत असल्याने डिझेलच्या वाढीबराेबरच वस्तूंच्या किमतीही वाढविल्या जातात. एवढेच नाही तर प्रवासी भाडेसुद्धा वाढविले जाते. दरवाढीमागे कारण विचारल्यास पेट्राेल व डिझेलचे भाव वाढल्याने दरवाढ झाली आहे, असे सांगितले जाते. चार दिवसांपूर्वी शासनाने पेट्राेल व डिझेलचे भाव कमी केले आहेत. त्यामुळे आता वस्तूंची निर्मिती व वाहतुकीवरीलही खर्च कमी झाला आहे. मात्र, सर्वच वस्तूंचे भाव जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पेट्राेल व डिझेलचे भाव सातत्याने वाढतात म्हणून इतर सर्व वस्तूंचे भाव वाढविण्यात आले हाेते. केंद्र शासनाने चार दिवसांपूर्वी एकाचवेळेवर डिझेल १० रुपये व पेट्राेल ५ रुपयांनी स्वस्त केले. पेट्राेल व डिझेल स्वस्त झाल्यावर इतर सर्व वस्तू स्वस्त हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, याचा काहीही परिणाम दिसून येत नाही. डिझेलचे भाव वाढल्यास निर्मितीचा खर्च वाढतो तसेच वाहतुकीच्या खर्चात भर पडत असल्याने डिझेलच्या वाढीबराेबरच वस्तूंच्या किमतीही वाढविल्या जातात. एवढेच नाही तर प्रवासी भाडेसुद्धा वाढविले जाते. दरवाढीमागे कारण विचारल्यास पेट्राेल व डिझेलचे भाव वाढल्याने दरवाढ झाली आहे, असे सांगितले जाते. चार दिवसांपूर्वी शासनाने पेट्राेल व डिझेलचे भाव कमी केले आहेत. त्यामुळे आता वस्तूंची निर्मिती व वाहतुकीवरीलही खर्च कमी झाला आहे. मात्र, सर्वच वस्तूंचे भाव जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पेट्राेल व डिझेलचे दर उतरल्याचा ग्राहकांना काय फायदा झाला, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. काेणत्या ना काेणत्या कारणामुळे दरवाढ हा बाजारपेठेचा नियम आहे. 

वाहतुकीचे दरही जैसे थे-   डिझेलचा सर्वाधिक वापर वाहतुकीच्या वाहनांमध्ये केला जाते. डिझेलचे दर कमी झाल्यानंतर वाहतुकीचे दर कमी हाेणे आवश्यक हाेते. मात्र प्रत्यक्षात वाहतुकीचे दर अजिबात कमी झाले नाही. त्यामुळे डिझेल स्वस्त झाल्याचा जनतेला काहीच फायदा झाला नाही.

महाग करण्याची घाई स्वस्त कधी हाेणार?-    उत्पादन खर्चाशी संबंधित एखाद्या कच्च्या मालाची भाव वाढ झाली की, व्यापाऱ्यांना तेवढेच कारण पुरेसे राहते. लगेच काही दिवसांत उत्पादनाची भाव वाढ करतात. मात्र, कच्च्या मालाचे भाव कमी झाले तरी उत्पादनाची किंमत कमी केली जात नाही. उलट ती स्थिर ठेवली जाते. हाच नियम पेट्राेल व डिझेलचे दर कमी हाेण्याला लागू झाला आहे. व्यापारी, व्यावसायिक यांचा हा अलिखीत नियम आहे. या नियमाच्या आधारेच चढाव व उताराचा फायदा व्यापारी व व्यावसायिक घेत असतात.

डिझेलचे दर पुन्हा जैसे थे हाेण्याची भीतीकेंद्र शासनाने सध्या पेट्राेल व डिझेलचे दर कमी केले असले तरी ते पुन्हा वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार दर दिवशी पेट्राेल व डिझेलचे दर वाढत राहतात. त्यामुळे पुढील एक महिन्यात ते दर आणखी जुन्याप्रमाणेच हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यापारीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे. 

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल