शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासासाठी एकवटले ढिवर, भोई बांधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:31 IST

समाजाच्या प्रश्नांवर मंथन : सायगावात सामूहिक बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : नजीकच्या सायगाव येथील बहुसंख्येने असलेल्या ढिवर (भोई) समाजाने आपल्या न्यायहक्कांसाठी २४ सप्टेंबरला ग्रामपंचायत कार्यालयाच्या राजीव भवनात समाजाला आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासात्मक दर्जा देण्यासंदर्भात मागण्यांसाठी नुकतीच बैठक घेऊन भोई समाज संघटनेची पायाभरणी केली. 

प्रा. भाग्यवान मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. मेश्राम यांनी, ढिवर भोई समाजाला पुढे जायचे असेल तर विखुरलेल्या समाजाला एकत्र आल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. तसेच वंचित असलेला हा समाज गरीब व अशिक्षित असून, मच्छीमार हा मुख्य व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. परंतु, समाजाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही, एनटीबीच्या आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही, त्यासाठी समाजाने शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि एकत्र या तरच समाजाचा विकास होणार, असेही आवाहन त्यांनी केले. 

बैठकीला सरपंच शिल्पा कोल्हे, उपसरपंच मनोज पांचलवार, सदस्य देवांगणा दुमाने, सदस्य चंदा मेश्राम, व ढिवर समाजबांधव, भगिनी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील दुमाने यांनी केले. आभार राजकुमार मेश्राम यांनी मानले. याप्रसंगी गावातील समाजाची महिला व पुरुषांची समिती गठित करण्यात आली असून, सुखदेव कोल्हे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

आरक्षणाचा प्रश्न कायमच गावातील बहुसंख्य असलेला ढिवर समाज वास्तव्यास असून, या समाजाकडे कुठल्याही प्रकारची शेती किंवा आर्थिक साधनसामग्री नाही. हा समाज अतिशय वंचित घटक असून, सरकारचे विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील समाजाकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली