शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचा धडक मोर्चा

By admin | Updated: July 1, 2014 01:28 IST

जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर

गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान येथील आयटीआय चौकातून जिल्हाभरातून शेकडो ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.या मोर्चाचे नेतृत्व ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, सहसचिव पुरूषोत्तम बनपुरकर, सरचिटणीस प्रदीप भांडेकर यांनी केले. मोर्चा पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेण्यात आली. या सभेमध्ये ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आक्रमक भूमिका मांडली. त्यानंतर ग्रामसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठविणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. दिलेल्या निवेदनात ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात याव्या, ग्रामपंचायतस्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ, कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत रूजू झालेल्या तारखेपासून ग्राह्य धरावा, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारीपद निर्माण करण्यात यावे, वेतनासोबत ३ हजार रूपये प्रवासभत्ता देण्यात यावा, सर्व संवर्गाकरिता बदल्यांचे धोरण एकच ठेवावे आदी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, विस्तार अधिकारी संघटना, जिल्हा परिषद नर्सेस संघटना, जिल्हा महिला समिती आदी संघटनांनी पाठींबा दर्शविला. या मोर्चात ग्रामसेवक संघटनेचे कायदे सल्लागार विजय पत्रे, विभागीय संघटक निलकंठ धानोरकर, शंकर कुनघाडकर, जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्यध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, जि. प. नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट, जिल्हा महिला समितीच्या सचिव माया बाळराजे आदी सहभागी झाले होते.यावेळी मार्गदर्शन करतांना उमेशचंद्र चिलबुले म्हणाले, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांचे सेवाविषयक, प्रशासकीय प्रश्न तसेच वेतनश्रेणीचा प्रश्न शासनासोबत वारंवार सकारात्मक चर्चा करूनही मार्गी लागले नाही. यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील ग्रामसेवक वर्गांमध्ये शासनाप्रती तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे ग्रामसेवकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. शासनाने मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उमेशचंद्र चिलबुले यांनी यावेळी दिला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. (स्थानिक प्रतिनिधी)