लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव-सावरगाव या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. विशेष म्हणजे, जपतलाई गावाजवळ जीवघेणे खड्डे निर्माण झाले असल्याने अपघातास आमंत्रण मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने काही दिवसापूर्वी काकडयेली-दुधमाळा दरम्यानचा हाच मार्ग सुस्थितीत असताना सुध्दा दुरूस्ती करण्यात आला. नव्याने डांबरीकरण करून लाखो रूपये उधळण्यात आले, असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.सदर मार्गावर मोहडोंगरी व लेखामेंढाजवळ रस्ता पूर्णत: खराब असताना या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. डांबरीकरणही करण्यात आले नाही. ज्या ठिकाणी दुरूस्तीची गरज होती, त्या ठिकाणी हे काम झाले नाही. मात्र आवश्यकता नसलेल्या ठिकाणी नव्याने डांबरीकरण करून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने भोंगळ कारभाराचा कळस गाठला आहे.मुरूमगाव-सावरगाव या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. या महामार्गावरून राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या तसेच ओव्हरलोड ट्रक व खासगी प्रवासी वाहने आवागमन करतात. रस्ता खराब असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने महामंडळाच्या बसेस कित्येकदा पंक्चर व नादुरूस्त झाल्या. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. मात्र धानोरा तालुक्यातील या रस्त्याच्या दुरवस्थेकडे अधिकाºयांसह लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत.खड्डेमुक्त महाराष्ट्राची संकल्पना पोहोचली नाहीराज्याचे सार्वजनिक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे जाहीर केले होते. मात्र ही संकल्पना धानोरा तालुक्यात एकाही गावात पोहोचली नाही. शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात या काही मोजक्याच रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली. अनेक ठिकाणी ही योजना फसली आहे.
धानोरा-मुरूमगाव मार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:43 IST
गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव-सावरगाव या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. विशेष म्हणजे, जपतलाई गावाजवळ जीवघेणे खड्डे निर्माण झाले असल्याने अपघातास आमंत्रण मिळत आहे.
धानोरा-मुरूमगाव मार्ग खड्ड्यात
ठळक मुद्देसुस्थितीतल्या मार्गाची केली दुरूस्ती : राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाचा अजब कारभार