शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा

By admin | Updated: December 24, 2014 22:59 IST

१९९६ च्या पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, पेसा कायद्याबाबत जनजागृती करण्यात यावी, तसेच २००६ च्या वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आदिवासींना न्याय द्यावा,

भारत जनआंदोलनाच्या नेतृत्वात : हजारो आदिवासी नागरिकांचा सहभाग; निवेदन सादरधानोरा : १९९६ च्या पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, पेसा कायद्याबाबत जनजागृती करण्यात यावी, तसेच २००६ च्या वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आदिवासींना न्याय द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी आज बुधवारला भारत जनआंदोलनाच्यावतीने धानोरा तहसील कार्यालयावर हजारोंच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व भारत जनआंदोलनाचे प्रमुख हिरामन वरखडे, विजय लपालीकर, डॉ. महेश कोपुलवार, हिरालाल येरमे, रोहिदास येरमे, जि. प. सदस्य अमोल मारकवार, मनिरावण दुग्गा, कुलपती मेश्राम आदींनी केले. सन्मानाने जगण्याचा अधिकार अभियानच्या धर्तीवर आज बुधवारला स्थानिक मॉ दंतेश्वरी मंदिराच्या ठिकाणाहून लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला. पेसा कायद्याच्या स्थापना दिवसावर आयोजित सदर मोर्चा धानोरा शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आला. त्यानंतर सदर मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी भारत जनआंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. या निवेदनात वनाधिकार कायद्यातील कलम ३ (१) (ई) नुसार जिल्ह्यातील माडिया, गोंड या आदीम जमाती समूहाला त्यांच्या समूहवस्ती व इतर पारंपरिक धारणा अधिकार लागू करण्यात यावे, राज्यपालांच्या निर्देशाने सध्या स्थगीत ठेवलेले ‘महाराष्ट्र ग्रामवन नियम २०१४’ हे पूर्णपणे रद्द करण्यात यावे, अनुसूचित क्षेत्रातील आदिवासीकडून बेकायदेशिरपणे बळकाविलेल्या शेतजमिनी परत करण्यात याव्या, तसेच भूहस्तांतरणाची संपूर्ण माहिती ग्रामसभांना पाठविण्यात यावी, वैयक्तिक वनहक्कधारक शेतकऱ्यांना मिळालेले पट्टे दुरूस्त करून त्वरित संपूर्ण मालकी हक्क असलेले दस्ताऐवज देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.या मोर्चात आयटक संघटनेचे पदाधिकारी देवराव चवळे, बाजीराव उसेंडी, गंगाराम आतला आदींसह धानोरा तालुक्यातील कारवाफा, पेंढरी, गट्टा, मुंगनेर, चव्हेला आदी परिसरातून हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. या मोर्चादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (तालुका प्रतिनिधी)