शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

मार्र्कं डेश्वर देवस्थानच्या विकासाला कवडीही नाही

By admin | Updated: December 17, 2015 01:33 IST

तालुक्यातील अतिप्राचीन व विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कं डेश्वर देवस्थानला विविध समस्यांनी ग्रासले आहे.

अनेक समस्या : लोकप्रतिनिधींसह मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन दुर्लक्षचचामोर्शी : तालुक्यातील अतिप्राचीन व विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कं डेश्वर देवस्थानला विविध समस्यांनी ग्रासले आहे. या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून भरीव आर्थिक मदतीची गरज आहे. याबाबत देवस्थान ट्रस्टच्या वतीने वारंवार मुख्यमंत्री व लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. परंतु गेल्या १०-१२ वर्षांत सरकारने राज्यातील अनेक देवस्थानांना अर्थसंकल्पात तरतूद करून मदतीचा हात दिला. मात्र मार्र्कंडेश्वरावर अद्याप राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या प्रसन्न झालेले नाही. त्यामुळे विविध समस्यांना घेऊन मार्र्कं डेश्वर मंदिराला अडचणी येत आहे. वैनगंगा उत्तरवाहिनी नदीच्या तीरावर मार्र्कं डेश्वर हे हेमांडपंथी मंदिर विराजमान आहे. गडचिरोलीपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या मार्र्कं डा येथे महाशिवरात्रीला दरवर्षी यात्रा भरते. सदर वास्तू ही पुरातन असल्यामुळे पुरातत्व खात्याअंतर्गत या मंदिर परिसराची देखभाल केली जाते. १९८९ मध्ये पूजाअर्चा व अंतर्गत कारभारासाठी विश्वस्त मंडळ राज्य सरकारने धर्मदाय आयुक्तांमार्फत नियुक्त केले. या मंदिराचे पुनर्निर्माण करण्याबाबत पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद येथील कार्यालयाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. परंतु त्यांचेही दुर्लक्ष झाले आहे. देवस्थान अतिप्राचीन असून मंदिराची दुरूस्ती होणे आवश्यक आहे. तसेच मंदिराचा कळस पूर्णत: खचलेला असून पावसाळ्यात गाभाऱ्या पाणी शिरते. मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम, अपुऱ्या भक्त निवासाचे बांधकाम, बनारसच्या धर्तीवर नदी घाटाचे बांधकाम, मैदानाचे सपाटीकरण, सौंदर्यीकरण व बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने १८ आॅक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन करण्यात आली. परंतु त्यानंतरही येथे कामाला सुरुवात झाली नाही. (शहर प्रतिनिधी)केंद्र सरकारकडून या आहेत अपेक्षाचार वर्षांपूर्वी केंद्र शासनाने पुरातत्व विभागामार्फत पश्चिमद्वार, गणेश मंदिर, नगारखाना या जुन्या वास्तू पूर्णपणे पाडून नव्याने त्याच दगडांनी जशाच्या तशा बनवून दिल्या आहे. दुरूस्ती कामाचा हाच धागा धरून मोडकळीस आलेल्या चार मंदिराची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी आहे. तसेच धार्मिक क्रियाक्रमासाठी पायऱ्या बनविणे (घाट बांधणे) या कामासाठी राज्य सरकारने ५० लक्ष रूपये दिले होते. परंतु केंद्र शासनाशी संबंधित खात्याने हे काम बंद पाडले. त्यामुळे हा निधी परत गेला. मार्र्कंडेश्वर मुख्य मंदिराचे पुनर्निर्माण करणे, मंदिर परिसरात पूर्ण फरशी किंवा सिमेंट काँक्रिटचे लहान-लहान रस्ते प्रत्येक मंदिरात जाण्याकरिता निर्माण करणे किंवा दगडाने पिचिंग करून बनविणे, मंदिर परिसराचे विद्युतीकरण करणे व विद्युत खांब लावून परिसर सुशोभित करणे, मंदिरासमोर पूर्वेकडील नदीपात्रात मंदिराखालच्या बाजुने बुरूज व ग्राम पंचायत घाट यातील खडक फोडून घाट बांधणे, सर्व घाटावर विद्युतीकरण व्यवस्था करून देणे हे काम केंद्र सरकारने पुरातत्व विभागामार्फत करून द्यावे, अशी मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय रसायन व खत मंत्री हंसराज अहीर यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु केंद्र सरकारकडून या कामासाठी उदासीनता दाखविण्यात येत आहे.राज्य सरकारकडून अर्थसंकल्पातही मार्कंडेश्वर दुर्लक्षितगेल्यावेळी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात राज्यातील अनेक पर्यटन व धार्मिक स्थळांना निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्यटनस्थळाला अद्याप निधी राज्य सरकारकडून उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे देवस्थान ट्रस्टसमोर भक्तांना सोयीसुविधा उपलब्ध करून देताना अडचण येत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने या मंदिराला आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर यांनी केली आहे.