शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अहिंसक कृतीतून चार गावांचा दारूबंदीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:18 IST

तालुक्यातील बोरमपल्ली, व्यंकटापूर व बामणी येथील गाव संघटनांची कार्यशाळा बामणी येथे २८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. छुप्या मार्गाने होत असलेल्या दारूविक्रीला आळा घालण्यासाठी अहिंसक कृतींवर भर देण्याचा निर्णय उपस्थित महिलांनी यावेळी घेतला.

ठळक मुद्देमहिला एकवटल्या : बोरमपल्ली, वैकटापूर, बामणी गावांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील बोरमपल्ली, व्यंकटापूर व बामणी येथील गाव संघटनांची कार्यशाळा बामणी येथे २८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. छुप्या मार्गाने होत असलेल्या दारूविक्रीला आळा घालण्यासाठी अहिंसक कृतींवर भर देण्याचा निर्णय उपस्थित महिलांनी यावेळी घेतला. तीनही गावांतील ७० महिला कार्यशाळेला उपस्थित होत्या.मुक्तिपथ गाव संघटनेच्या प्रयत्नातून बोरमपल्ली, व्यंकटापूर व बामणी या तीनही गावांमध्ये ठराव घेऊन दारूविक्री बंद केली आहे. असे असले तरी छुप्या मार्गाने विक्रेते दारूची विक्री करीत आहेत. यावर अंकुश आणण्यासाठी आवश्यक उपायांवर कार्यशाळेत तालुका मुक्तिपथ चमूने मार्गदर्शन केले. काहीच दिवसांपूर्वी बोरमपल्ली येथे गाव संघटनेच्या महिलांनी मोहसडवा व इतरही दारूसाठा नष्ट केला होता. सोबतच महिला ग्रामसभा घेऊन यापुढे दारू विक्री करताना कुणी आढळल्यास त्यावर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. कार्यशाळेत त्यांनी ही माहिती दिली. गावातील दारूविक्री थांबविण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने अहिंसक कृतीवर भर देणार असल्याचे बामणी व व्यंकटापूर येथील गाव संघटन सदस्यांनी सांगितले. गावात होत असलेल्या दारूविक्रीचा सर्वाधिक त्रास हा महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे दारूविक्री बंद होण्यासाठी महिलांनीच पुढे येण्याची गरजही गाव संघटनेच्या सदस्यांनी बोलून दाखविली. संपूर्ण गावातील महिलांना संघटीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदीWomenमहिला