शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांकडून धानाची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:31 IST

वैरागड येथील किल्ल्यालगत असलेल्या झाडाझुडूपांत दिवसभर रानडुकरे आश्रयाला असतात. रात्रीच्या सुमारास परिसरातील धान पुंजण्याची नासधूस करतात. त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देवन विभागाकडून पंचनामे : वैरागडच्या किल्ल्यालगत रबी पिकाचेही नुकसान

आॅनलाईन लोकमतवैरागड : वैरागड येथील किल्ल्यालगत असलेल्या झाडाझुडूपांत दिवसभर रानडुकरे आश्रयाला असतात. रात्रीच्या सुमारास परिसरातील धान पुंजण्याची नासधूस करतात. त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत.यंदाच्या खरीप हंगामात तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने धानाचे उत्पादन अर्ध्यावर आले. त्यातही जे उत्पादन हाती येण्याची शक्यता होती ते सुद्धा रानडकरांकडून नासधूस केली जात असल्याने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिसकावला जात आहे. वन्य जीवांच्या शिकारीबाबत वन विभागाचे अत्यंत कडक नियम असल्याने वन्य जीवांच्या शिकारींच्या प्रमाणात मोठ्या प्र्रमाणावर घट झाली आहे. रानडुकरामुळे दरवर्षी पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे रानडुकरांच्या शिकारीबाबत कायदा शिथिल करावी, अशी मागणी होती. यासाठी आघाडी शासनाच्या काळात रानडुकरांच्या बाबतीत शिथिलता देणारा कायदा करण्यात आला होता. परंतु राज्यात विद्युत पुरवठ्याने वन्य प्राण्यांचे शिकार होण्याचे प्रमाण वाढल्याने तसेच वाघाच्या शिकारीचे प्रमाण उघडकीस आल्यानंतर कायदा अधिक कडक करण्यात आला. वैरागड परिसरातील ज्या शेतातीत धान, तूर पिकाची खरोखरच हानी झाली. त्यांच्या धानाचे पंचनामे करून वरिष्ठांकडे अहवाल आर्थिक भरपाईसाठी वन विभागामार्फत पाठविण्यात आले आहेत.वडधा परिसरातही नुकसानपरिसरातील टेंभा, चांभार्डा, मरेगाव, मौशिखांब, डार्ली, बोरी येथील बहुतांश शेती जंगलाला लागून आहे. या शेतीत रात्रीच्या सुमारास डुकरे येऊन धानाच्या गंजीची नासधूस करतात. तसेच रबी पिकाचेही नुकसान करतात. त्यामुळे वन विभागाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांकडून वन विभागाकडे होत आहे.रानडुकरांमुळे पिकांची हानी होत असेल तर वन विभागाच्या अटी, शर्तीनुसार रानडुकराची शिकार करता येते. परंतु इतर वन्य जीवांना इजा देखील होऊ नये. वन्यजीवांना धोका झाल्यास कायदेशीर कारवाई होते.- एम. एन. मेश्राम, क्षेत्र सहायक वैरागड.