शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांचा सडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

तालुक्यातील गर्कापेठा येथील दारूविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती बामणी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी शेख व त्यांच्या पथकाने ५ ऑक्टोबर रोजी सोमवारला सकाळी ७ वाजता विशेष अभियान राबवत गावात तपासणी केली.

ठळक मुद्देगर्कापेठा येथील हातभट्ट्या उद्ध्वस्त : बामणी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : बामणी पोलिसांनी गर्कापेठा येथील हातभट्टीच्या ठिकाणी धाड टाकून जवळपास पाच लाखांचा ७५ ड्रम सडवा नष्ट केला. हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या.तालुक्यातील गर्कापेठा येथील दारूविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती बामणी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी शेख व त्यांच्या पथकाने ५ ऑक्टोबर रोजी सोमवारला सकाळी ७ वाजता विशेष अभियान राबवत गावात तपासणी केली. दरम्यान ४ लाख ९१ हजारांचा ७५ ड्रम सडवा व इतर साहित्य पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी तो संपूर्ण मुद्देमाल नष्ट करून गावात दारूविक्री न करण्याचे आवाहन केले.गर्कापेठा येथील गाव संघटनेच्या पुढाकारातून दीड वर्षांपासून गावात दारूविक्री बंद आहे. मात्र काही विक्रेत्यांनी गुळ आणून सडवा टाकला होता. गावातील विविध ठिकाणी ५० ड्रम सडवा टाकला असल्याची माहिती मुक्तिपथ चमूला मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांना कळविण्यात आले. स्वामी यांनी गर्कापेठा येथे अभियान राबविण्याचे निर्देश बामणी पोलिसांना दिले. प्रभारी पोलीस अधिकारी शेख व त्यांचे पथक गर्कापेठा येथे रवाना होऊन गावातील १३ ते १४ विविध ठिकाणांची पाहणी केली. दरम्यान गावातील मेडी दुर्गम, सुनीता महेश दुर्गम, तिरुपती कुमरी, गौरया जाळी, शंकर राजम जाळी, समया कोंडागुर्ला, राजन्ना कोंडागुर्ला यांच्या घर परिसरात मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा आढळून आला असून आरोपी फरार आहेत. ७३ ड्रम गुळाचा व २ ड्रम मोह सडवा, ५० लिटर दारू, १३ पेट्या गूळ व दारू गळण्याचे साहित्य, असा एकूण ४ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.बामणी पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम भागातही पोलिसांच्या दारूविरोधी कारवाया वाढल्या असल्याचे दिसून येते.पुराडातील ७ दुकानांवर दंडात्मक कारवाई४कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथे पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या मोहीम राबवत गावातील सात दुकानाची तपासणी केली. दरम्यान सातही दुकानांतून तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करीत ३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. संपूर्ण मुद्देमालाची होळी करून पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. गावात छुप्या मागार्ने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक पोलीस व मुक्तिपथच्या तालुका चमूला मिळताच संयुक्तरित्या दुकानांची तपासणी केली. दरम्यान कुरखेडा शहराच्या सात दुकानांमध्ये सुगंधित तंबाखू, गुळाखु, खर्रा, नस आदी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्या दुकानदारांकडून एकूण तीन हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पुराडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.गोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई गणेश भर्रे, रवी उसेंडी, अवकाश मितनवरे यांनी केली.