शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली दोन नागरिकांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:43 IST

नक्षलवादी संघटना पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गुरिला आर्मी) च्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून (दि.2) पाळल्या जात असलेल्या विशेष सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत दोघांची हत्या केली.

ठळक मुद्देपीएलजीए सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांचा धुमाकूळरस्त्यावर झाडे टाकून अडविला मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नक्षलवादी संघटना पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गुरिला आर्मी) च्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून (दि.2) पाळल्या जात असलेल्या विशेष सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत दोघांची हत्या केली. याशिवाय काही ठिकाणी रस्त्यावर झाडं टाकून मार्ग अडवत बॅनरबाजी केल्याने दहशत पसरली आहे. पोलिसांना सहकार्य करत असल्याच्या संशयातून मध्यरात्रीच त्यांचे घरातून अपहरण केल्याची माहिती आहे. आज सकाळी त्यांचे मृतदेह आढळले. मासो ढेबला पुंगाटी (५५) व ऋषी लालू मेश्राम (५२) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही खाणकामावर जात असल्याचा रोष नक्षल्यांच्या मनात असल्याने त्यांची हत्या झाल्याचे सांगितले जाते. याशिवाय कमलापूर-दामरंचा मार्गावर रस्त्यालगतची झाडे कापून टाकली. त्यामुळे हा मार्ग अडला असून त्या भागात बॅनर लावून पीएलजीए सप्ताह पाळण्याचे आवाहन केल्याचे कळते. पोलिसांनी त्या भागात जाण्यास मनाई केली आहे. कमलापूर हा काही वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांचा गड होता. पण अलीकडे पोलिसांचे नेटवर्क वाढल्याने त्या भागातील नक्षलवाद्यांचा वावर कमी झाला आहे. पण पीएलजीए सप्ताहाच्या निमित्ताने नक्षलवादी आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी