शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षलग्रस्त गडचिरोलीत

By संजय तिपाले | Updated: August 15, 2023 18:40 IST

शौर्यपदक प्राप्त पोलिस अधिकारी व जवानांचा सत्कार

गडचिरोली:  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मंगळवारी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलप्रभावित अहेरी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी प्राणहिता पोलिस उपमुख्यालय येथे नक्षलविरोधी कारवाईत उल्लेखनीय कार्य केलेल्या शौर्य पदक प्राप्त २६ पोलिस अधिकारी व जवानांचा सत्कार केला.

प्रथम पोलिस स्मृतिस्थळास मानवंदना व पुष्पचक्र वाहून फडणवीस यांनी अभिवादन केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम,खासदार अशोक नेते,आमदार कृष्णा गजबे,आमदार डॉ. देवराव होळी, माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यासाठी गडचिरोली पोलिसांचे मोठे योगदान आहे. पोलिसांच्या शौर्याची बलिदान दखल केंद्र सरकारने घेतली आहे.त्यांचा दीड पट वेतनाचा मार्ग मोकळा करून दिला असून पुढील आदेशापर्यंत तो बंद होणार नाही. पोलिस दलाला कोणतीच कमतरता भासू देणार नसून रराज्य सरकार सदैव सोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी पोलिस संकुल येथे पोलिस कँटीन,बाल उद्यान,ग्रंथालयाचे उदघाटन त्यांनी केले. गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून पोलिस विभाग बळकटीकरणासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांचे लोकार्पण केले. त्यांनी अतिदुर्गम भागातील पाच मोबाईल टॉवरचे ऑनलाइन लोकार्पण केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कनेक्टिव्हिटीबाबत विचारपूस केली. त्यामुळे ग्रामस्थ भारावून गेले होते.

पोलिसांचे वाढवले मनोधैर्यपोलिस व नक्षल्यांमध्ये नेहमीच धुमश्चक्री होतात. अशावेळी पोलिसांना जीव धोक्यात घालून नक्षल्यांचा सामना करावा लागतो. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कारवाफा या अतिदुर्गम ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस जवानांशी संवाद साधला. स्थानिक नागरिकांना त्यांनी विविध योजनांची माहिती दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस