शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

डेंग्यूने निर्माण केली दहशत

By admin | Updated: May 22, 2014 01:05 IST

मागील वर्षीच्या पावसाळ्यापासून वर्षभरात डेंग्यू आजाराने सहा नागरिकांचा बळी घेतला

गडचिरोली : मागील वर्षीच्या पावसाळ्यापासून वर्षभरात डेंग्यू आजाराने सहा नागरिकांचा बळी घेतला असून डेंग्यूची साथ अजूनही जिल्ह्याच्या काही भागात सुरूच असल्याने नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराविषयी अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू आजारापासून सुटका प्राप्त करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे.

डेंग्यू आजार हा डेंग्यू या विषाणुमुळे होतो. डेंग्यू संक्रमणात्मक डासाने चावा घेतल्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर रूग्णाला ताप येणे सुरू होतो. या रोगाची दोन प्रकारे लागन होते. पहिल्या प्रकारात डेंग्यू ताप आणि दुसर्‍या प्रकारात डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप यांचा समावेश होतो. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा अधिक स्वरूपाचा आजार असून यामुळे रूग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता राहते. तापाबरोबरच डेंग्यू रूग्णाला एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना होणे, स्नायू व सांध्यांमध्ये वेदना, छातीवर पुरळ येणे, नाक, तोंड, हिरड्यातून रक्तस्त्राव होणे, रूग्णाला तहान लागणे, तोंड कोरडे पडणे आदी लक्षणे दिसून येतात.

जिल्ह्यात यावर्षी डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले. अगदी मागील वर्षीच्या पावसाळ्यापासून सुरू झालेली डेंग्यूची साथ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही अधूनमधून डोके काढत आहे. उन्हाळ्यामध्ये डेंग्यूची साथ राहात नाही, असा सर्वसाधारण अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. मात्र यावर्षी उन्हाळासुद्धा डेंग्यूच्या साथीपासून सुटला नाही. गडचिरोली येथील गोकुळनगर, पुलखल, लक्ष्मणपूर या गावांमध्ये डेंग्यू साथीने अलिकडेच चांगलेच थैमान घातले होते.

१५ दिवसांमध्ये तब्बल ४१ डेंग्यूचे संशयीत रूग्ण आढळून आले. यापैकी चार नागरिकांना डेंग्यूची लागन झाली असल्याचे स्पष्ट झाले. वर्षभरात डेंग्यूच्या आजाराने सहा नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथील दोन नागरिक, राजगट्टा चक येथील एक नागरिक व गडचिरोली शहरातील गोकुळनगर येथील तीन नागरिकांचा समावेश आहे. अधूनमधून येत असलेल्या डेंग्यूच्या साथीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये फार मोठी भीती निर्माण झाली आहे.

डेंग्यू हा साथीच्या आजारामध्ये मोडणारा आजार आहे. या रोगावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा हिवताप अधिकार्‍याबरोबरच साथरोग अधिकार्‍याची सुद्धा आहे. मात्र साथरोग अधिकार्‍यांकडे आरोग्य विभागातील औषधी भांडार, मानव विकास मिशन अंतर्गत समन्वय ठेवण्याचे काम तसेच जिल्हा प्रशिक्षण पथकाच्या कामाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या खर्‍या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने डेंग्यू रोगाची साथ वाढत चालली आहे. (नगर प्रतिनिधी)