शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

शापोआ कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

शालेय पोषण आहार कर्मचारी अल्प मानधनावर काम करतात. त्यांना किमान दरमहा १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी दिल्ली, मुंबई व नागपूर येथील मंत्रालयावर अनेक वेळा मोर्चे, आंदोलने करण्यात आली. जिल्हास्तरावरही अनेक वेळा आंदोलने झाली. महाराष्ट्र शासनाने २३ नोव्हेंबर २०१६ रोजी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याना मासिक पाच हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार केंद्र शासनाने दोन हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर केले.

ठळक मुद्दे१८ हजार रुपये मासिक मानधन द्या : कुरखेडा पंचायत समितीसमोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : मानधनवाढीच्या आश्वासनांची पुर्तता करावी, या मुख्य मागणीसाठी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी ९ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय मेळावा आयोजित करून कुरखेडा पंचायत समितीसमोर निदर्शने केली.शालेय पोषण आहार कर्मचारी अल्प मानधनावर काम करतात. त्यांना किमान दरमहा १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी दिल्ली, मुंबई व नागपूर येथील मंत्रालयावर अनेक वेळा मोर्चे, आंदोलने करण्यात आली. जिल्हास्तरावरही अनेक वेळा आंदोलने झाली. महाराष्ट्र शासनाने २३ नोव्हेंबर २०१६ रोजी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याना मासिक पाच हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार केंद्र शासनाने दोन हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर केले. मात्र अजुनपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मानधन सुध्दा मागील अनेक महिन्यांपासून थकीत आहे. केंद्रीय कामगार संघटनेच्या मागणीनुसार त्यांना शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, सामाजिक सुरक्षा लागू करावी, इंधन बिलाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करावी, वर्षातून दोन वेळा ड्रेसकोड व ओळखपत्र द्यावे. चुकीच्या पध्दतीने कामावरून कमी करू नये, कामाची वेळ निश्चित करून पोषण आहाराव्यतिरिक्त इतर कामे सांगू नये, आदी मागण्यांसाठी पंचायत समिती समोर निदर्शने करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे यांनी केले. यावेळी तालुका अध्यक्ष दिलीप नाईक, विमल बर्डे, शितल नैताम, कविता ढोलणे, वंदना देशमुख, सुमन नैताम, पार्वता पोरेटी, शारदा पंधरे, देवला मेश्राम, यश्वदा नरोटे, वासुदेव पुडो, रेवता गावडे, शालू पेंदाम, वर्षा कोल्हे, संतोष घरत, सविता प्रधान, निर्मला दुमाने, संगीता मडावी यांच्यासह तालुकाभरातील ५० पेक्षा अधिक शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक