शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत अभियंत्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:40 IST

गडचिराेली : सबऑर्डिनेट इंजिनीअर असाेसिएशन गडचिराेलीच्या वतीने विविध मागण्यांसाठी महावितरण अर्थात विद्युत क्षेत्रातील अभियंत्यांनी संप पुकारला असून, अतिरिक्त कार्यभार ...

गडचिराेली : सबऑर्डिनेट इंजिनीअर असाेसिएशन गडचिराेलीच्या वतीने विविध मागण्यांसाठी महावितरण अर्थात विद्युत क्षेत्रातील अभियंत्यांनी संप पुकारला असून, अतिरिक्त कार्यभार साेडला आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ प्रशासनात खळबळ उडाली आहे.

बुधवारी गडचिराेली येथील वीज अभियंत्यांनी मंडळ कार्यालयासमाेर द्वारसभा घेऊन कंपन्यांच्या धाेरणाचा निषेध नाेंदविला. या सभेत असाेसिएशनचे जिल्हा सहसचिव पुरुषाेत्तम वंजारी यांनी अभियंत्यांना संबाेधित केले. आता दुसऱ्या टप्प्यात अभियंत्यांनी अतिरिक्त कार्यभार साेडल्याने प्रशासन अडचणीत आले आहे.

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती प्रशासन अभियंत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने सबऑर्डिनेट इंजिनीअर असाेसिएशनच्या वतीने ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत तीनही कंपन्यांच्या प्रशासन दरबारी चर्चा करण्यात आली. या चर्चेत अभियंत्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, हे आश्वासन फाेल ठरले. महापारेषण प्रशासनाने ऑर्डर नं. ३ नुसार स्टाॅफसेट अप धाेरण एकतर्फी लागू करण्याचा डाव आणला. दरम्यान, अभियंत्यांची ५०० पेक्षा अधिक पदे रिक्त ठेवण्याचा घाट रचल्याचा आराेप संघटनेने केला आहे.

महावितरण प्रशासनाने सर्वसाधारण बदली धाेरणामध्ये ‘अनिवार्य रिक्त पदे’ ही संकल्पना आणल्याने सर्वसामान्यांच्या बदल्यांवर अंकुश आलेला आहे. त्यामुळे अभियंत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

६ सप्टेंबरला लाक्षणिक संप

येत्या ६ सप्टेंबरला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याची हाक सब ऑर्डिनेट इंजिनीअर असाेसिएशनने दिली असून, प्रशासनाने मागण्या निकाली न काढल्यास बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.