लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आदिवासी हलबा-हलबी समाजाच्या वतीने एकता शक्ती दिवस कुरखेडा येथे गुरूवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहरातून कलशयात्रा व मिरवणूक काढून एकता व शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले.सुरूवातीला हलबा-हलबी समाजाचे दैैवत माँ दंतेश्वरी, गैदसिंह नायक, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मंचावरील प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन आमगावचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आदिवासी हलबा-हलबी समाजाचे शालिकराम मानकर होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. मेघराज कपुर, प्रभू राजगडकर, अभिनेते विरा साथीदार, कुसूम अलाम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, यशवंत मलय्या, हिरालाल भोई उपस्थित होते.उद्घाटनानंतर फरेंद्र कुतीरकर व सुरेश नाईक यांच्या ‘आदिवासी हलबा-हलबी समाज व त्यांची भाषा : एक अभ्यास’ या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. समाजासाठी उत्कृष्ट कार्य करीत असल्याबद्दल आ. सहषराम कोरोटे, फरेंद्र कुतीरकर, माधव गावड यांचा समाजातर्फे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.आदिवासी समाजावर अन्याय होत आहे. त्यासाठी समाजाने एकजुटता दाखवावी तसेच समाजाच्या रूढी व परंपरांचे जतन करावे, असे प्रतिपादन सहषराम कोरोटे यांनी केले. यावेळी जी. आर. राणा, ओ. एस. जमवाल, मुरलीबापू प्रधान, अजमन राऊत, परमसिंग पवार, नीताराम कुमरे, अंताराम मडावी, अशोक कुथे, अशोक इंदूरकर, रामकुमार प्रधान, जयदेव मानकर, प्रेमलाल कोरोंडे, तुलाराम मारगाये, कपूर नाईक, मुकुंद मलये, गुलाब सोनकुकरा, डॉ. तिमेश्वर कोरोटी, नंदकिशोर नैताम, अमरसिंग गेडाम, दादाजी प्रधान, यशवंत चौरीकर, महादेव पुंगळा, तानेश ताराम उपस्थित होते.प्रास्ताविक माधवराव गावळ, संचालन पद्माकर मानकर तर आभार सरादू चिराम यांनी मानले. यशस्वीतेसाठी मनोहर गावळ, सुधीर गद्देवार, ज्ञानेश्वर राणे, अशोक प्रधान, सुरेश नाईक, लोकचंद बालापुरे, मनोहर चव्हारे, कैलास कोरोटे, गणेश औरासे, हेमंत मानकर, तुलाराम मारगाये, गजू नाईक यांच्यासह समाजबांधवांनी सहकार्य केले.देखाव्यांचे सादरीकरणएकता शक्ती दिनानिमित्त कार्यक्रमस्थळी महिला बचत गट कुरखेडा, नवरगाव, पिंपळगाव (हलबी), मालदुगी, शिवणी, चिरचाडी येथील समाजबांधवांनी उत्कृष्ट देखाव्यांचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच आदिवासी हलबा-हलबी समाजाच्या सांस्कृतिकतेचे दर्शन घडविणारी चित्रफित दाखविण्यात आली.
मिरवणुकीतून एकता शक्तीचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST
आदिवासी हलबा-हलबी समाजाच्या वतीने एकता शक्ती दिवस कुरखेडा येथे गुरूवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहरातून कलशयात्रा व मिरवणूक काढून एकता व शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले.
मिरवणुकीतून एकता शक्तीचे प्रदर्शन
ठळक मुद्देधार्मिक ध्वजारोहण : कुरखेडा येथे हलबा-हलबी समाजातर्फे कलश यात्रा