चिंतलपेठात कार्यक्रम : ३० महिलांना कोटचे वाटपअहेरी : तालुक्यातील चिंतलपेठ येथील कापूस वेचणाऱ्या महिलांना कृषी विज्ञान केंद्र सोनापूरच्या वतीने कापूस वेचणी कोट वापरण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. चिंतलपेइातील ३० महिलांना कापूस वेचणी कोट देण्यात आले. गृहविज्ञानच्या विषय विशेषत्ज्ञ योगीता सानप, कृषी विज्ञान केंद्राचे देगावकर, कृषी सहायक जाधव, कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे, ज्ञानेश ताथोड, प्रमोद भांडेकर, हितेश राठोड, निशान टेकाम, प्रविण नामुरते यांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कोटाचा उपयोग कापूस वेचणीबरोबरच मिरची, वांगे तोडण्यासाठी सुध्दा केला जाऊ शकतो. चिंतलपेठा येथील शेतकरी महिलांना कापूस वेचणी कोट विषयी माहिती समजावून सांगण्यात आली. सदर कोटचा वापर केल्यामुळे कंबर व पाठीचा त्रास कमी होण्यास मदत होते. पारंपरिक साधनांच्या तुलनेत कोट अतिशय कमी किमतीत उपलब्ध होते. त्याचबरोबर या कोटमुळे आरोग्य सुरक्षित राहत असल्यामुळे महिलांनी या कोटचा वापर करावा, असे मार्गदर्शन उपस्थित असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी केले.
कापूस वेचणी कोटचे प्रात्यक्षिक
By admin | Updated: January 16, 2017 00:57 IST