शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्री काम दाखवून देयक उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:03 IST

जिल्हा परिषदेच्या धानोरा उपविभागाच्या वतीने तालुक्यातील मुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरूस्ती व सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देजि.प. बांधकाम उपविभागाचा भोंगळ कारभार : मुरूमगाव पीएचसीच्या कामाचे साडेआठ लाखांचे बिल

ऑनलाईन लोकमतधानोरा : जिल्हा परिषदेच्या धानोरा उपविभागाच्या वतीने तालुक्यातील मुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरूस्ती व सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात कुठलेही काम न करता केवळ कागदोपत्री दुरूस्ती केल्याचे दाखवून एका कंत्राटदाराच्या नावे ८ लाख ८९ हजार ८२४ रूपयांचे देयक अदा करण्यात आले असून ही रक्कम संबंधित कंत्राटदाराने उचलल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.पं.स. सभापती अजमन राऊत व जि.प. सदस्य लता पुंगाटे यांचे स्वगाव असलेल्या मुरूमगाव येथील आरोग्य केंद्राची दुरूस्ती न करता साडेआठ लाख रूपयांचे देयकाची उचल करण्यात आली. दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी दुरूस्तीच्या कामाकरिता १५ लाख रूपयांचा निधी प्रशासनाने मंजूर केला. या आरोग्य केंद्राची दुस्तीच करण्यात आली नाही. मात्र साडेआठ लाख रूपयांचा निधी गोविंदगाव ग्रा.पं. प्रशासनाने खर्च केल्याचे दाखवून कंत्राटदाराच्या नावे बिल काढले. २२ जुलै २०१७ रोजी कंत्राटदाराला धनादेश देण्यात आला. जि.प. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपविभागीय अभियंता, संबंधित कंत्राटदार यांच्यामध्ये संगनमत करून हा प्रकार करण्यात आला. यापूर्वी ढोरगट्टा-खरगी-पयंडी रस्त्याचे काम थातुरमातूर करून १० लाख रूपयांचे बिल एका कंत्राटदाराला बाध्ांकाम विभागाने अदा केले. याबाबतचे वृत्त लोकमतने १६ जानेवारीला प्रकाशित केले होते.अभियंत्यांसह ग्रा.पं. वर कारवाई करामुरूमगाव आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीचे काम न करता साडेआठ लाख रूपयांचे देयक संबंधित कंत्राटदाराला अदा करण्यात आले. या प्रकारामध्ये ग्रामपंचायत प्रशासन, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपविभागीय अभियंता यांची भूमिका आहे. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जि.प. सदस्य लता पुंगाटे यांनी केली आहे. सदर मुद्दा त्यांनी जि.प. च्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडला होता, अशी माहिती पुंगाटे यांनी लोकमतला दिली आहे.सदर निधीतून मुरूमगाव आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियागृह, शौचालय बांधकाम, फ्लोरिंग, स्टाईल व इतर सुविधा निर्माण करावयाच्या होत्या. मात्र काम न झाल्याने या सुविधा सध्यातरी कागदावर असल्याचे दिसून येत आहे.