शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली शहरासाठी १३८ कोटींच्या निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:32 IST

शहरात विविध विकास कामे करण्यासाठी १३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे. गडचिरोली शहरात राष्ट्रीय महामार्गाला लागून सर्व्हिस रोड तयार करणे व राखीव ठेवलेल्या जागांचे हस्तांतरण करणे,

ठळक मुद्देनगराध्यक्षांचे निवेदन : प्रॉपर्टी कार्डसाठी ४.७२ कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरात विविध विकास कामे करण्यासाठी १३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.गडचिरोली शहरात राष्ट्रीय महामार्गाला लागून सर्व्हिस रोड तयार करणे व राखीव ठेवलेल्या जागांचे हस्तांतरण करणे, मार्ग बांधणे यासाठी ५० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. गडचिरोली शहराचा विस्तार वाढला आहे. विस्तारलेल्या शहरात नवीन पाईपलाईन टाकणे, पाणी टाक्यांचे झोनिंग तयार करणे यासाठी ४३ कोटी ४७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. याचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सोपविण्यात आले आहे.शहराचे सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड देण्याकरिता ४ कोटी ७२ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. नगर पालिकेचे स्वतंत्र प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी रुपये, लांझेडा परिसरातील तलावामध्ये बगिचासाठी पाच कोटी रुपये, वातानुकुलित नाट्यगृहासाठी २० कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्षांसोबत चर्चा केली. गडचिरोली शहराला यापूर्वीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नव्याने मागितला जाणारा निधी सुध्दा उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री