वैरागड : येथील जुन्या बाजार चौकातील व बाजार चौकापासून आरमोरी मार्गावरील पांडव देवस्थानपर्यंतचा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. वैरागड-आरमोरी या मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तसेच छत्तीसगड ते हैदराबादपर्यंत चालणारी जड वाहतूक याच मार्गाने होत असल्याने मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे पावसाने रस्ता खड्डेमय झाला. सार्वजनिक बांधकाम विभाग, आरमोरी यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने या मार्गावर आजपर्यंत अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. याच मार्गावर पांडव देवस्थान रस्त्याजवळ डिसेंबर महिन्यात सुकाळा व मानापूर येथील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. परंतु बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी अथवा दुरुस्ती केली नाही. सदर मार्गाच्या दुरुस्तीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा आहे.
वैरागड-ठाणेगाव मार्गाच्या दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:38 IST