शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पंचनामे करून मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

ज्या नागरिकांची घरे कोसळली, त्यांच्या कुटुंबांना ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसचिवालयात आश्रय देऊन या कुटुंबांच्या जेवनाची व्यवस्था जि.प. सदस्य संपत आळे यांनी केली.

ठळक मुद्देनुकसान : मोहटोला, तळोधी, वैरागड परिसरातील शेकडो घरे कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/तळोधी/वैरागड : अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे कोसळली आहेत. नुकसानीचा पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी पीडित नागरिकांकडून होत आहे.मोहटोला परिसरातील पोटगाव येथील ४० घरांची पडझड झाली. विहिरगाव येथील १५ घरे कोसळली. डोंगरगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या चिखली तुकूम, चिखली रिठ, अरततोंडी व डोंगरगाव मिळून ५० पेक्षा अधिक घराची पडझड झाली आहे. किन्हाळा व मोहटोला येथील एकूण १२ घरांची पडझड झाली आहे. किन्हाळा येथील अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना समाज मंदिरात राहावे लागले आहे.तळोधी मो. परिसरातील मुरमुरी येथील बाबुराव ठाकरे, दादाजी निकोडे, राहूल धर्मा वाढई, देवराव कोठारे यांची घर कोसळली. येडानूर येथील लबानतांड्यावरील मनवर जाधव, कनिराम पवार, पावीमुरांडा येथील संदीप मंगरू किरंगे, सुनिता गावडे, शंकर पोटावी, मुतनूर येथील रामचंद्र मोदी नरोटे, ढेकणी येथील दीपक दशरथ आत्राम यांच्या घराची पडझड झाली. त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहेत.वैरागड येथील अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. तसेच अतिवृष्टीमुळे अशोक कोंडेकर यांच्या घरासह अनेकांच्या घरांची पडझड झाली. त्यामुळे त्या कुटुंबांना निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ज्या नागरिकांची घरे कोसळली, त्यांच्या कुटुंबांना ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसचिवालयात आश्रय देऊन या कुटुंबांच्या जेवनाची व्यवस्था जि.प. सदस्य संपत आळे यांनी केली. या कामात पं.स. सदस्य व्ही. डी. बावणकर, सरपंच गौरी सोमनानी, उपसरपंच श्रीराम अहिरकर, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनीही सहकार्य केले. पंचनामे करून मदतीची मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊस