शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

रस्ता मोकळा करून देण्याची मागणी

By admin | Updated: October 6, 2016 02:11 IST

तालुक्यातील पालोरा येथील १२ शेतकऱ्यांना शेतजमिनीकडे जाणारा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी देसाईगंजचे

पाच वर्षांपासून संघर्ष : पालोरातील शेतकरी अडचणीतआरमोरी : तालुक्यातील पालोरा येथील १२ शेतकऱ्यांना शेतजमिनीकडे जाणारा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांनी केली आहे. पालोरा येथील १२ शेतकरी शेताकडे जाण्यासाठी रावदेवचा पांदण रस्ता वापरत होते. मात्र गावातील एका शेतकऱ्याने सदर रस्ता मोडीत काढला. भूमिअभिलेख कार्यालयाकडून सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यांनी सुद्धा व्यवस्थित सर्वे करून दिला नाही. नकाशात पांदण रस्ता स्पष्ट दिसत नसल्याचे म्हटले आहे. रस्ता बंद केल्याने संबंधित शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.मागील पाच वर्षांपासून रस्ता मोकळा करून देण्याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार व महसूल अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनपर्यंत यावर तोडगा निघाला नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून सदर रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी सुनील सोमनकर, हरिदास सोमनकर, पार्वता बारसागडे, देवकाबाई चिचघरे, ज्योती कोहळे, दौलत बांते, किसन नंदनवार, बंडू कांबळे, जयदेव मुंगीकोल्हे, श्यामलाबाई मने, रमेश मोगरकर, विजय कोल्हटकर, ताराचंद कोल्हटकर, शालिकराम नाकाडे, देवाजी तिजारे, वामन सोनटक्के, पत्रू भांडेकर, मारोती नैताम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)