मे २०१८ मध्ये रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने काम झाले नाही. त्यानंतर तांत्रिक अडचणी आल्या व काही दिवसांनंतर पावसाने रस्ता वाहून गेला. मार्च २०२० पासून काेरोना संसर्गामुळे देश लाॅकडाऊनमध्ये अडकला. धानोरा- रांगी- वैरागड मार्गाचे काम प्रभावित झाले हाेते. सोडे ते मोहली मार्गावर जून, जुलै २०२० मध्ये परत कामाला सुरुवात करण्याकरिता गिट्टी टाकून पसरविण्यात आले. आता काम पूर्ण होईल, अशी नागरिकांची अपेक्षा हाेती. मात्र, ही अपेक्षा फाेल ठरली. मोहली ते रांगी- विहीरगाव १८ किमी मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी बाहेर निघाली असल्याने रस्त्यावरून वाहन चालने कठीण झाले आहे. कंत्राटदारांच्या दुर्लक्षितपणामुळे मागील अडीच वर्षांपासून वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे सदर मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
धानाेरा-रांगी-वैरागड मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:33 IST