शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनातून दारूबंदीची ओवाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:31 IST

तालुक्यातील मोहटोला, पेठतुकूम, किटाळी, देलोडा, पाथरगोटायासह आरमोरी शहरातील महिलांनी मंगळवारी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधून दारूबंदीची ओवाळणी मागितली. ‘आम्हाला एक रुपयाही नको, आमच्या गावातील दारूची विक्री थांबवा’ हीच आमची राखीची ओवाळणी आहे, अशी मागणी महिलांनी केली.

ठळक मुद्देपैसे नको, दारूविक्री थांबवा : पाच गावांसह आरमोरी शहरातील महिलांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील मोहटोला, पेठतुकूम, किटाळी, देलोडा, पाथरगोटायासह आरमोरी शहरातील महिलांनी मंगळवारी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधून दारूबंदीची ओवाळणी मागितली. ‘आम्हाला एक रुपयाही नको, आमच्या गावातील दारूची विक्री थांबवा’ हीच आमची राखीची ओवाळणी आहे, अशी मागणी महिलांनी केली.समाजातील सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे. पोलीस त्यासाठी तत्परही आहे. पण तालुक्यातील काही गावांमध्ये दारूची छुप्यामार्गाने विक्री होत आहे. परिणामी या गावांतील महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा भांडणतंटे होतात. गावात सलोख्याचे वातावरण तयार होण्यासाठी गावातील दारूविक्री बंद होणे आवश्यक आहे. ही मागणी पूर्ण होण्यासाठी तालुक्यातील मोहटोला, पेठतुकूम, किटाळी, देलोडा, पाथरगोटा आदी गावासह आरमोरी शहरातील एकूण ५२ महिलांनी मंगळवारी आरमोरी पोलीस स्टेशन गाठून रक्षाबंधन सण साजरा केला.यावेळी सहायक पोलीस निरीक्षक बोनसे यांच्यासह ३८ पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांना राखी बांधताना महिलांनी, ह्यगावात कधी चोरून लपून तर कधी उघडपणे दारूविक्री होत असते. याचा त्रास आया-बहिणींनाच सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, दादा आम्हाला तुमचाच आधार आहे. आम्हाला एका रुपयाही नको. राखीची ओवाळणी म्हणून केवळ ‘आमच्या गावातील दारूविक्री बंद करा. हीच आमची ओवाळणी’, अशी भावनिक भेट वचनाच्या रुपात मागितली.यावेळी महिलांनी गावातील इतर समस्याही मांडल्या. मुक्तिपथ तालुका चमूने या कार्यक्रमाचे नियोजन केले.विक्रेत्यांवर कारवाई करूयावेळी सहायक पोलीस निरीक्षक बोरसे यांनी दारूविक्री बंद करण्याची हमी देतानाच दारू पिणाऱ्याकडून तसेच व्यसनी नवऱ्याकडून त्रास असल्यास नक्की सांगा, आम्ही तातडीने कारवाई करण्याचे वचन महिलांना दिले. गाव संघटनांना सोबत घेऊन दारुविक्रेत्या-विरोधात कठोर कारवाई करणार असेही ते म्हणाले.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनPoliceपोलिस