शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

प्रवासी अपघात विम्याची रक्कम देण्यास दिरंगाई

By admin | Updated: September 17, 2016 01:43 IST

नागपूरकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मे महिन्यात नागभिड तालुक्यात अपघात झाला.

नागभिडजवळ झाला होता अपघात : अनेकवेळा परत पाठविला प्रस्ताव गडचिरोली : नागपूरकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मे महिन्यात नागभिड तालुक्यात अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यास अजुनही प्रवाशी सहाय्यता अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात आला नसल्याचा आरोप त्याचे वडील बब्बू शेख यांनी केला आहे.गडचिरोली येथील लांझेडा वार्डातील विद्यार्थी साजीद बब्बू शेख हे २९ मे २०१६ रोजी काम्पा ते मोहाडी दरम्यान प्रवास करीत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला. या अपघातात एक जण ठार व १४ प्रवाशी जखमी झाले. या जखमीमध्ये गडचिरोली येथील साजीद बब्बू शेख (१४) यांचाही समावेश होता. साजीद शेख यांच्या समावेत त्याचे वडील व आईही प्रवास करीत होते. आई-वडील दोघेही किरकोळ जखमी झाले. या तिघांची नागपूर ते गडचिरोली प्रवास तिकीट ५५२ रूपये झाली होती. यात अपघात विम्याचे प्रत्येकी एक रूपयाप्रमाणे तीन रूपये राज्य परिवहन महामंडळाने घेतले. बब्बू शेख यांचा मुलगा साजीदचे दोन्ही पाय या अपघातात क्षतिग्रस्त झाले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी शेख यांना जवळजवळ दोन ते अडीच लाखांचा खर्च आला. हा खर्च केल्यानंतर जखमीचे वडील बब्बू शेख यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक गडचिरोली आगार यांच्याकडे अपघात विम्याच्या रक्कमेची मागणी केली. ही मागणी करताना शेख यांनी राज्यसरकारने सुरू केलेल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजनेचे सर्व निकष व त्या संदर्भातील पत्रक राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दाखविले व मुलाच्या सर्व वैद्यकीय खर्चाचे विवरणही शासनाच्या निकषानुसार गडचिरोली विभागीय एसटी कार्यालयात सादर केले. त्यानंतर या कागदपत्रांची तपासणी करून यातील त्रुटी एकाचवेळी बब्बू शेख यांना सांगणे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य होते. मात्र असे न करता प्रत्येक आठ दिवसाने एक-एक त्रुटी सांगून अपघात विमा सहाय्यता निधी वितरित करण्याबाबतचे काम लांबविले जात आहे.याबाबत बब्बू शेख यांनी गडचिरोली येथील एसटीच्या विभागीय नियंत्रकाची भेट घेतली. तर त्यांनी आम्हाला प्रवाशाकडून प्रत्येकी एक रूपया अपघात सहाय्यता निधीसाठी घेण्याच्या सूचना आहेत. मात्र अपघातात जखमी वा ठार झालेल्यांना रक्कम वितरित करण्याबाबत शासन आदेश अद्याप आलेला नाही, असे सांगून हात वर केले. त्यामुळे बब्बू शेख अतिशय कठीण मनस्थितीत सापडले असून एकीकडे मुलाच्या अपघातानंतर शस्त्रक्रियेसाठी लागलेला खर्च व मुलगा १२ वी असल्याने त्याच्या अभ्यासाच्या बाबतही कुटुंबाला प्रचंड चिंता आहे. परिवहन मंत्र्यांनी यांनी लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी शेख यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)एसटी अपघातात मुलगा साजीद हा जखमी झाल्याबाबत वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळण्यासाठी बब्बू शेख यांनी कागदपत्रानिशी प्रस्ताव सादर केला आहे. मात्र त्यांनी माझ्याशी थेट संपर्क न करता, इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा माझी भेट घेतली. तत्काळ आपण त्यांचा प्रस्ताव व कागदपत्रे नागपूरच्या डॉक्टरांकडे पडताळणीसाठी पाठविले. सदर प्रस्तावाबाबतची संपूर्ण प्रक्रिया आठवडाभरात त्यांना योजनेंतर्गत वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम अदा करण्यात येईल.- व्ही. पी. गव्हाळे, विभागीय नियंत्रक, एसटी गडचिरोली