शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दबक्या पावलांनी आली... ग्रामस्थांच्या सतर्कतेने पुन्हा जंगलात गेली!

By संजय तिपाले | Updated: May 17, 2023 14:10 IST

सुंकरअल्ली गावात १७ मे रोजी एक हरीण पाण्याच्या शोधात आले. या हरणाला श्वानांनी घेरले

गडचिरोली: जिल्ह्यात उन्हाचा पारा ४३ अंशावर गेल्याने मानवांसह वन्यप्राण्यांच्या जिवाची अक्षरश: काहिली होत आहे. वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने पाण्याची सोय केलेली आहे, पण दुर्गम, अतिदुर्गम भागात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. तहानेने व्याकूळ झालेले एक हरीण १७ मे रोजी सकाळी सिरोंचा तालुक्यातील सुंकरअल्ली गावात पाेहोचेले, पण दबक्या पावलांनी पोहोचलेल्या या हरणाला भटक्या श्वानांनी घेरले. ग्रामस्थांनी श्वानांच्या तावडीतून सुटका करत हरणाला जीवदान दिले.

सुंकरअल्ली गावात १७ मे रोजी एक हरीण पाण्याच्या शोधात आले. या हरणाला श्वानांनी घेरले. भेदरलेले हरीण कावरे-बावरे झाले. त्यास काही सूचत नव्हते.  यावेळी पोलिस पाटील रत्नाकर चौधरी, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समय्या चौधरी, रमेश धनी यांनी श्वानांना हुसकावत हरणाला सुरक्षित ताब्यात घेतले.त्यानंतर असरअल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात फोनवरुन माहिती दिली.क्षेत्र सहायक के.एस.शेख, वनरक्षक आर.पी.गेडाम, एम.एच.कोल्हे, वाहनचालक सुनील मुरमाडे यांनी रोजंदारी मजुरांसह सुंकरअल्ली गाठले. या हरणाला पाणी पाजून नंतर जीपमधून असरअल्ली जंगलात नेले, तेथे दोर सोडून त्यास मुक्त केले. त्यानंतर टुणकन् उड्या मारत क्षणार्धात ते जंगलात गुडूप झाले.

 

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली