शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

एटापल्लीत होणार डेडीकेटेड कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 5:00 AM

एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी निर्माण होत असलेल्या नवीन शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत सुरूवातीला विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. परंतु तालुक्यात कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने विलगीकरण कक्षाचे रूपांतर कोरोना केअर सेंटरमध्ये करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : ५० बेड्सह व्हेंटीलेटर, एक्स-रे, ईसीजी व अन्य सुविधा मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने विलगीकरण केंद्राचे कोरोना केअर सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले. परंतु रुग्णांना बाहेर रेफर करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन येथे आता डेटीकेटेड कोविड हेल्थ सेंटर तयार केले जाणार आहे. या प्रस्तावित हेल्थ सेंटरच्या व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी दीपक सिंगला व सीईओ कुमार आशीर्वाद यांनी बुधवारी केली. डीसीएचसीमध्ये ५० बेड्सह अन्य आरोग्यविषयक सुविधा राहणार आहेत.एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी निर्माण होत असलेल्या नवीन शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत सुरूवातीला विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. परंतु तालुक्यात कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने विलगीकरण कक्षाचे रूपांतर कोरोना केअर सेंटरमध्ये करण्यात आले.अनेक कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना आलापल्ली तसेच गडचिरोली येथे नेणे वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे नसल्याने याच सेंटरमध्ये आता डीसीएचसी निर्माण केले जाणार आहे. या केंद्रातील व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी करून तालुक्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला व त्यादृष्टीने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.याप्रसंगी जि.प.सीईओ कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल, संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नटवरलाल श्रुंगारे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे उपस्थित होते.हे रुग्ण होणार भरतीकोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण ठेवले जातात. सध्या येथे १० रुग्ण आहेत. तर डीसीएचसीमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे असलेले गंभीर रुग्ण ठेवले जाणार आहेत. यासाठी येथे ५० बेडची व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे तालुक्यासह परिसरातील कोरोना रुग्णांसाठी स्थानिकस्तरावरच सोय होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल