शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पेंढरीला उपतालुका घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 00:07 IST

दूर असलेल्या तालुकास्थळी जाऊन प्रशासकीय कामे करणे येथील नागरिकांना अशक्य होते. त्यामुळे पेंढरीला तालुक्याचा दर्जा देतपर्यंत किमान उपतालुक्याचा दर्जा देऊन नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी ठेवावा, तसेच इतर विभाग या ठिकाणी सुरू करावे, यासाठी लढा उभारण्याचे ठरविण्यात आले.

ठळक मुद्देग्रामपंचायतीत सभा : नायब तहसीलदाराची नियुक्ती करण्यासाठी पाठपुरावा करणार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : पेंढरी परिसरातील गावे धानोरा तालुका मुख्यालयापासून सुमारे ८० ते ९० किमी अंतरावर आहेत. एवढ्या दूर असलेल्या तालुकास्थळी जाऊन प्रशासकीय कामे करणे येथील नागरिकांना अशक्य होते. त्यामुळे पेंढरीला तालुक्याचा दर्जा देतपर्यंत किमान उपतालुक्याचा दर्जा देऊन नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी ठेवावा, तसेच इतर विभाग या ठिकाणी सुरू करावे, यासाठी लढा उभारण्याचे ठरविण्यात आले.पेंढरी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात तालुका निर्माण कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. बैठकीला जि.प.सदस्य श्रीनिवास दुलमवार, पेंढरीचे सरपंच पवन येरमे, रूपेंद्र नाईक, अरूण शेडमाके, शत्रुघ्न येरमे, डोमाजी लेनगुरे, संतोष मंडल, उत्तम आतला, काशिनाथ आतला, माणिक हिचामी आदी उपस्थित होते.पेंढरी तालुक्याची निर्मिती व्हावी, यासाठी फेब्रुवारी महिन्यात आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनानंतर किती समस्या मार्गी लागल्या व किती प्रलंबित आहेत, यावर विचार मंथन करण्यात आले. पेंढरी तालुका निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र तालुका निर्मितीस उशीर होऊ शकते. त्यामुळे किमान पेंढरीला उपतालुक्याचा दर्जा द्यावा. या ठिकाणी महसूल भवनाची इमारत आहे. या इमारतीचे लोकार्पण करून नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी, तसेच महत्त्वाचे विभाग या ठिकाणी ठेवावे. जेणेकरून महत्त्वाची कामे या कार्यालयात करता येऊन धानोरा येथे जावे लागणार नाही. यासाठी लढा उभारणे व पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.१४ नोव्हेंबर रोजी संयुक्त गाव गणराज्य परिषद इलाक्याची जवळपास ५० गावांची झाडा येथे संयुक्त सभा घेतली जाणार आहे. या सभेत आंदोलनाची रूपरेषा ठरविली जाईल. जिल्हास्तरावर पाठपुरावा करून उपतालुका निर्मिती होईपर्यंत स्वस्त बसायचे नाही, असाही ठराव घेण्यात आला.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार