शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अरततोंडी ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:36 IST

तालुक्यातील अरततोंडी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खरमत टोला, देऊळगाव, अरततोंडी या तिन्ही गावातील नागरिकांनी एकत्र येऊन अवैधरित्या सुरू असलेल्या दारूविक्री बंद करण्याचा निर्णय २७ सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत घेतला.

ठळक मुद्देतीन गावांतील नागरिकांचा एल्गार : दारूविक्रेत्यांकडून २५ हजार रूपयांचा दंड वसूल करणार

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्यातील अरततोंडी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खरमत टोला, देऊळगाव, अरततोंडी या तिन्ही गावातील नागरिकांनी एकत्र येऊन अवैधरित्या सुरू असलेल्या दारूविक्री बंद करण्याचा निर्णय २७ सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत घेतला. मागील ग्रामसभेत देऊळगाव वासियांनी दारूबंदीचा निर्णय घेऊन गावात दारूबंदी केली. याच धर्तीवर गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या तिन्ही गावात दारूबंदी करून संपूर्ण गट ग्रामपंचायत दारूमुक्त व्हावी, या उद्देशाने ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला.ग्रामसभेत पारित केलेल्या ठरावात गावातील दारू विक्री बंद व्हावी, यासाठी काही ठोस निर्णय घेण्यात आले. त्यानुसार दारू विक्रेत्यांना त्यांच्याजवळ असलेल्या दारूची विक्री करण्यासाठी ९ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली. त्या दिवसापर्यंत आपल्या जवळ असलेल्या दारूची व मोहफुलाची विल्हेवाट लावावी, असे सांगण्यात आले. मुदतीनंतरही दारू विक्री केल्यास संबंधितांकडून ग्रामसभेच्या माध्यमातून २५ हजार रुपये दंड वसूल केला जाईल, असेही सांगण्यात आले. तसेच, त्या नंतरही जर दारू विक्री सुरू राहिली तर दारू विक्रेत्यांना ग्राम पंचायत, तलाठी कार्यालय, पोलीस पाटील यांच्या कडून मिळणारे कागदपत्र देण्यात येणार नाही. दारूमुक्ती गाव संघटनेच्या व ग्रामसभेच्या नियमाचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल. दारू विक्रेत्याची कोणीही जमानत घेऊ नये. घेतल्यास त्यालाही दारू विक्रेत्याला लावलेले नियम लागू केले जातील व १० हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. तसेच जंगलामध्ये लपून दारू काढताना आढळून आल्यास वनविभागाची मदत घेऊन कारवाई करण्यात येईल, हे सर्व ठराव सर्वांनुमते पारित करण्यात आला.सभेला सरपंच साईनाथ खुणे, सचिव महेंद्र देशमुख, पोलीस पाटील मीनाक्षी शेडमाके, गीता लोहंबरे, पंचायत समिती सदस्य शारदा पोरेटी, वनपाल लक्ष्मीकांत ठाकरे, वनरक्षक सचिन कुथे, नानाजी खुणे, मुक्तिपथचे तालुका प्रेरक शरद निकुरे, प्रेरक माधुरी नैताम तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि अरततोंडी, खरमत टोला, देऊळगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :liquor banदारूबंदी