शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घोट तालुका निर्मितीचा निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:09 IST

गेल्या ३५ वर्षापासून घोट तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. घोट परिसराच्या विकासासाठी तालुक्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र शासनाकडून यावर निर्णय घेण्यात आला नाही.

ठळक मुद्देशासनाकडे मागणी : लोकप्रतिनिधींसह संघर्ष समितीचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटले

ऑनलाईन लोकमतघोट : गेल्या ३५ वर्षापासून घोट तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. घोट परिसराच्या विकासासाठी तालुक्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र शासनाकडून यावर निर्णय घेण्यात आला नाही. आता तरी विद्यमान राज्य सरकारने ठोस निर्णय घेऊन घोट तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी घोट तालुका निर्माण संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात घोट तालुका निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्याशी तालुका निर्मितीच्या विषयावर चर्चा केली.याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, घोटचे सरपंच विनय बारसागडे, उपसरपंच साईनाथ नेवारे, विलास गण्यारपवार, विलास उईके, भगवान धोडरे, अनुप अध्येंकीवार आदी उपस्थित होते. घोट तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, या मागणीला घोट, पेटतळा, सिमुलतला, नेताजी नगर, भाडभिडी बी, हळदवाही, मक्केपल्ली, माडेआमगाव, रेगडी, विकासपल्ली आदीसह परिसरातील बहुतांश ग्रामपंचायतीचे समर्थन आहे. निवेदनासोबत प्रस्तावित घोट तालुक्यात समाविष्ट २७ ग्रामपंचायत व ७० गावांची यादी, प्रस्तावित घोट तालुक्याचा नकाशा, चामोर्शी तालुका सरपंच संघटनेचे पत्र जोडण्यात आले आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री