आरमोरी : खुशाल किसन चहांदे (६७, आरमाेरी) यांचे अपघाती निधन झाले. १४ मार्च राेजी रात्री फेरफटका मारताना मोटरसायकलने त्यांना धडक दिली, यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बैद्यनाथ सोनी
एटापल्ली : साेन्या-चांदीचे व्यावसायिक बैद्यनाथ सुरेंद्र सोनी (५५, एटापल्ली) यांचे रविवारी पहाटे ४.३० वाजता आकस्मिक निधन झाले. अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातवंड असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते मूळचे बिहार राज्यातील रहिवासी हाेत.