शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

२० गावातील नागरिकांचा छाेट्या नावेने ‘मृत्युप्रवास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 08:00 IST

Gadchiroli News सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा आणि त्या परिसरातील २० गावांतील नागरिकांना पुलाअभावी गरजेच्या वस्तू, व्यवहार आणि नातेसंबंधासाठी प्राणहिता नदीच्या पात्रातून धोकादायक प्रवास करत पैलतीरावरील तेलंगणा गाठावे लागते.

ठळक मुद्देतेलंगणा सीमेवरील गावांतील प्रत्यक्ष चित्र तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष

कौसर खान

गडचिरोली : देशातील मागास जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागापर्यंत अजूनही शासनाच्या कोणत्याच योजना पोहोचलेल्या नाहीत. आर्थिक, सामाजिक विकास तर दूर, या भागातील नागरिकांच्या प्राथमिक गरजाही अजून कोणत्याच शासनाकडून पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा आणि त्या परिसरातील २० गावेही त्यापैकीच आहेत. एका पुलाअभावी तेथील नागरिकांना गरजेच्या वस्तू, व्यवहार आणि नातेसंबंधासाठी प्राणहिता नदीच्या पात्रातून धोकादायक प्रवास करत पैलतीरावरील तेलंगणा गाठावे लागते.

जिल्हा मुख्यालयापासून २०० ते २५० किलोमीटर आणि सिरोंचा या तालुका मुख्यालयापासून ७० किलोमीटरवर असलेला रेगुंठा परिसर महाराष्ट्राचा भाग आहे. मात्र संस्कृती, परंपरा, भाषा यामुळे त्या भागातील लोक तेलंगणाशीच जास्त जुळले आहेत. गावे विरळ आणि कमी लोकवस्तीची असल्याने त्यांचा आवाज शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविणारा ‘मसिहा’ कोणी नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेण्याची आणि त्या दूर करण्याची गरज कोणाला आतापर्यंत वाटली नाही.

२० किलोमीटरसाठी ७० किमीचा भुर्दंड

रेगुंठा व परिसरातील २० गावांमधील नागरिकांसाठी जवळचे शहर म्हणजे तेलंगणातील चेन्नूर, मंचेरियाल, वारंगल किंवा हैदराबाद. प्राणहिता नदीतून गेल्यास अवघ्या २० किलोमीटवर चेन्नूर, ५० किलोमीटरवर मंचेरियाल आहे. पण नदीवर पूल नसल्यामुळे लोक छोट्या नावेने १०० रुपये देऊन तिकीट देऊन पैलतीर गाठतात. रुग्णांना न्यायचे झाल्यास मात्र ७० किलोमीटर अधिक अंतर पार करून सिरोंचामार्गेच जावे लागते. यात वेळ आणि पैसाही खर्च होतो.

दोन्ही राज्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

रेगुंठा परिसरात कोत्तापल्ली ते तेलंगणातील शेवटचे गाव वेमनपल्ली या दोन गावांना जोडणारा पूल प्राणहिता नदीवर उभारल्यास या परिसरातील नागरिकांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. विशेष म्हणजे या पुलाच्या उभारणीबाबत पाहणी करण्यासाठी तीन ते चार वेळा दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी येऊन नकाशावरून पाहणी केली. पण आतापर्यंत काहीच झाले नाही, अशी व्यथा रेगुंठा परिसरातील किरण कुर्मा या टॅक्सीचालक युवतीने व्यक्त केली.

टॅग्स :Socialसामाजिक