शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडातील जीर्ण टाकी धोकादायक

By admin | Updated: August 7, 2016 01:42 IST

येथील किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे.

निर्लेखन रखडले : नवीन टाकीतून सुरू आहे पाणीपुरवठा; कायम दुर्लक्ष वैरागड : येथील किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. सदर टाकी कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र या टाकीचे निर्लेखन करून अजूनपर्यंत ती पाडण्यात आली नाही. वैरागड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी वैरागड येथे नळ योजना बांधण्यात आली. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागावर ७५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. नंतर ही पाण्याची टाकी जीर्ण झाल्याने ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस भोयर यांच्या घराजवळ दीड लाख लिटर क्षमतेची दुसरी टाकी उभारण्यात आली. नवीन टाकी उभारून सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने निकामी तसेच जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीचे निर्लेखन करून त्याची विल्हेवाट लावली नाही. सदर टाकी कोणत्याही क्षणी कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन ते तीन हॉटेल आहेत. मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी नेहमीच गर्दी राहते. जुनी पाण्याची टाकी होती तेव्हा सगळ्याच नळधारकांना कमीअधिक प्रमाणात पाणी उपलब्ध होत होते. मात्र नवीन टाकीचे बांधकाम झाल्यापासून सखल भागामध्ये असलेल्या नळांना रात्रंदिवस पाणी उपलब्ध होते. मात्र उंच भागावर असलेल्या नळधारकांना पाण्यासाठी नेहमीच पायपीट करावी लागत आहे. (वार्ताहर)