शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष तोडीमुळे वन्यजीवांची वस्तीस्थाने सापडली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:02 IST

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमान्वये वन्यजीवांची वस्तीस्थाने अथवा वावर असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन करून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याने वैरागड परिसरासह अनेक भागात वन्यजीवांची वस्तीस्थाने धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देवाईल्ड लाईट ट्रस्टने व्यक्ती केली चिंता । जंगलातील पाण्याचे स्रोतही नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमान्वये वन्यजीवांची वस्तीस्थाने अथवा वावर असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन करून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याने वैरागड परिसरासह अनेक भागात वन्यजीवांची वस्तीस्थाने धोक्यात आली आहे.वनांचा विकास करणे हे वन विकास महामंडळाचे काम आहे. मात्र मागील पाच-सहा वर्षांपासून वडसा तालुक्यातील विहीरगाव, चिखली रिठ तसेच कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, सावलखेडा आणि आरमोरी तालुक्यातील सालमारा, वैरागड येथील घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. १० वर्षांपूर्वी घनदाट दिसणारे जंगले आता उजाड माळरान झाली आहेत. या घनदाट जंगलात वाघ, हरिण, नीलगाय, अस्वल तसेच अन्य वन्यजीवांची निवासस्थान होते. हे निवासस्थान आता नष्ट झाले आहे. याला एफडीसीएमचे धोरण जबाबदार आहे, असा आरोप संबंधित गावाच्या वनसंरक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.वन्यप्राणी, वन व जैविक विविधता यावर प्रतिकूल परिणाम करणारी कोणतीही कृती थांबविण्यासाठी ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाचे अनुपालन करणे बंधनकारक आहे. असे असताना सुद्धा एफडीसीएमच्या वृक्षतोडीला ग्रामसभेने विरोध केला असता, संबंधित लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन बळाचा वापर करून वृक्षतोडीचे काम सुरूच ठेवण्यात आले. एफडीसीएमतर्फे जिल्ह्याच्या विविध भागात वृक्षतोडीचे काम सुरूच आहे. ही वृक्षतोड थांबवून वन व वन्यजीवांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी शिरपूर, भगवानपूर, वैरागड येथील नागरिकांनी केली आहे. जंगले विरळ झाले व जंगलात मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यजीव रस्त्यावर येत आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने प्राणी गावाकडे धाव घेत आहे.वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी जनजागृती हवीपाण्याच्या शोधात अनेक वन्यप्राणी गावालगतच्या पाणवठ्याच्या ठिकाणी आपली तहान भागविण्याकरिता येतात. अशा ठिकाणी शिकारी दबा धरून बसतात. परिणामी वन्यजीव मानवी फाशात अडकतात. हे सर्व प्रकार बंद होण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया महाराष्टÑाचे प्रभारी प्रफुल भाबुरकर व विदर्भ समन्वयक अनिल कुमार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी १६ ते रोजी कुरखेडा, आरमोरी, वडसा तालुक्यातील वनक्षेत्राचा दौरा करून पाहणी केली होती.

टॅग्स :forestजंगलwildlifeवन्यजीव