शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
8
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
9
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
10
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
11
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
12
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
13
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
14
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
15
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
17
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
19
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
20
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास

पोलिसांकडून दलित कुटुंबाला त्रास

By admin | Updated: July 14, 2016 01:11 IST

आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबोली गावालगतच्या अतिक्रमीत जमिनीवर गेल्या ४० वर्षांपासून मेश्राम कुटुंबीय शेती कसत आहे.

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार : दोषींवर कारवाई करण्याची मागणी गडचिरोली : आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबोली गावालगतच्या अतिक्रमीत जमिनीवर गेल्या ४० वर्षांपासून मेश्राम कुटुंबीय शेती कसत आहे. मात्र गावातील पोलीस पाटील व काही नागरिकांनी सदर जमिन स्मशानभूमीच्या कामासाठी मागितली. त्यानंतर मेश्राम कुटुंबीयांनी नकार दिल्याने गावातील काही नागरिकांनी या जमिनीत शेती कसण्यास विरोध करून शेतीपयोगी साहित्य हिसकावून नेले. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली आलेल्या आष्टी पोलिसांनी मेश्राम कुटुंबाला शिविगाळ करून त्रास दिला. सदर प्रकार गंभीर असल्याने दोषी पोलीस व व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे पदाधिकारी व अन्यायग्रस्त मेश्राम कुटुंबातील सदस्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी माहिती देताना फेडरेशनचे अध्यक्ष विनय बांबोळे व अन्यायग्रस्त महिला कविता मेश्राम यांनी सांगितले की, ५ जुलै रोजी आंबोेली येथील पोलीस पाटील वंदना रामटेके, रवींद्र कातकर, राजू मांडवगडे, राजू उंदीरवाडे, बंडू चंदनखेडे, भास्कर दयाळ यांनी अतिक्रमीत जमिनीवर शेती कसण्यास विरोध करून शेतीपयोगी साहित्य हिसकावून नेले, याबाबत आपण आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता, तक्रार घेतली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देणार, असे सांगितल्यावर पोलिसांनी तक्रार घेतली. मात्र कुणावरही गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावात येऊन आष्टीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे, पोलीस हवालदार पोटवार यांनी आम्हाला शिविगाळ केली. तसेच शेतीच्या जागेवर सर्व नागरिकांसमोर अवार्च शब्दात बोलून मला शिविगाळ केली, असे कविता मेश्राम यांनी यावेळी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्व दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करून न्याय द्यावा, अशी मागणी मेश्राम कुटुंबाने यावेळी केली. पत्रपरिषदेला दिलीप गोवर्धन, चांगदास मसराम, कबीर निकुरे, पुरूषोत्तम मेश्राम, अनूप मेश्राम, सुरेश मेश्राम, पंकज साखरे हजर होते. आंबोली येथील कविता पुरूषोत्तम मेश्राम कुटुंबासोबत ग्रामपंचायतीचा जागेच्या विषयावरून वाद आहे. सदर जागा स्मशानभूमीची असून तिच्यावर ग्रा. पं. चा ताबा आहे. आपण चौकशी करण्यासाठी आंबोली गावात सहकारी कर्मचाऱ्यांसह गेलो होतो. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी दरम्यान नांगर चालविल्यावर जमिनीतून माणसाच्या शरीराचे हाडही निघाले. आपण कविता मेश्राम व त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची शिविगाळ व मारहाण केली नाही. ग्रामपंचायत प्रशासन आपल्या मालकीची जागा स्मशानभूमीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र मेश्राम कुटुंबाकडून सहकार्य मिळत नसल्याचे चौकशीत दिसून आले. - संदीप शिंगटे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे, आष्टी