शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी निघणार दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:24 IST

१ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर शिवनेरीपासून मुंबईपर्यंत पेन्शन दिंडी काढली जाणार आहे.

ठळक मुद्देतालुकाभरातील तहसीलदारांना निवेदन : २ आॅक्टोबर रोजी शिवनेरी ते मुंबईपर्यंत मार्च

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर शिवनेरीपासून मुंबईपर्यंत पेन्शन दिंडी काढली जाणार आहे. यामध्ये राज्यातील हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फत शासनाला पाठविले आहे.राज्य शासनाने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी अधिसूचना काढली. या अधिसूचनेत १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना १९८२ व ८४ ची निवृत्त वेतन योजना बंद करून परिभाषीत अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेचे स्वरूप आता या योजनेत सुनिश्चित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये या योजनेविषयी असंतोष आहे. आजपर्यंत अनेकवेळा निवेदने देण्यात आली. आंदोलने करण्यात आली. मात्र शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही. नवीन अंशदायी पेन्शन योजनेमुळे लाखो कर्मचाऱ्यांचे भविष्य अधांतरी आहे. त्यामुळे या योजनेचा विरोध केला जात आहे.२ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर महाराष्टष्ट्रातील लाखो कर्मचारी शिवनेरीपासून मुंबई येथे पेन्शन दिंडी काढणार आहेत. मागणीची पूर्तता न झाल्यास तेथेच मंत्रालयासमोर बेमुदत सामुहिक उपोषण करणार आहेत, असे निवेदन म्हटले आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांना तहसीलदारांच्या मार्फत पाठविले आहे.धानोरा तहसीलदारांना निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, तालुकाध्यक्ष दीपक सुरपाम, उपाध्यक्ष वर्षा गंगाखेडकर, शरद जगताप, माजीद शेख, देहारकर, दुधबावरे, शारदा गावंडे, सोनाली कंकलवार हजर होते.कोरची येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. मुलचेरा येथे गजानन गेडाम, अशोक बोरकुटे, कुरखेडात तुळशीदास नरोटे, शिल्पा नवघडे, अशोक इंदूरकर, तांदळे, सुजीत दास, रोशन कापसे, नारायण मलिक, अमित मिस्त्री, सत्यजीत मंडल, निहार मिस्त्री, प्रविण पोटवार, अंकूश मैलारे, प्रणय कयाल, प्रणव देवनाथ, चामोर्शी येथे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अंकूश मैलारे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

टॅग्स :TahasildarतहसीलदारGovernmentसरकार