शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

फायर लाइनसाठी जिवंत झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:50 IST

उन्हाळ्यात जंगलाला आगी लागू नयेत यासाठी भंडारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर नेट (जाळी) लावण्याचा प्रयोग वनविभागाने केला हाेता, परंतु हा ...

उन्हाळ्यात जंगलाला आगी लागू नयेत यासाठी भंडारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर नेट (जाळी) लावण्याचा प्रयोग वनविभागाने केला हाेता, परंतु हा प्रयाेग फसल्याने वनविभागाने वणवे प्रतिबंधासाठी फायर लाइनचा कुचकामी प्रयोग चालविला आहे. यात रस्त्यालगतच्या झाडांवर कुऱ्हाड चालवली जाते. जंगलांना आगी लागू नये म्हणून दरवर्षी वनविभागाकडून जंगल वाटेच्या दुतर्फा फायर लाइन जाळली जाते. जंगल वाटेने जाणारे वाटसरू बिडी, सिगारेट ओढल्यानंतर पेटती बिडी, सिगारेट जंगलाच्या कडेला फेकून देतात. ही आग जंगलापर्यंत पसरत जाते. पण त्यापेक्षा जास्त आगी मोहफूल वेचणीचा हंगाम सुरू झाला की लागतात. कारण त्या आगी मुद्दाम लावल्या जातात.

दरवर्षी फायर लाइन तयार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. पण वणवे लागणे थांबत नाही. वणवे विझवण्यासाठी वनविभागाकडे प्रभावी उपाययोजनादेखील नाही. जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनांची आणि वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात हानी होते. मौल्यवान वनसंपदा नष्ट होते. अनेक वन्यजीव आगीत तडफडून मरतात. तर काही वन्यजीव जिवाच्या आकांताने सैरावैरा पळून मोकळ्या जागेचा आश्रय घेतात. त्यातही लोकांकडून त्यांची शिकार केली जाते.

वनविभाग विभागाकडून फायर लाइनसाठी रस्त्याच्या कडेच्या झाडांची जी तोड केली जाते ती अनावश्यक असल्याचा सूर व्यक्त होत आहे.

बाॅक्स

या कारणांमुळे जंगलात लागतात वणवे

मोहफूल वेचणारे लोक आपल्या साेयीसाठी झाडाखालील पालापाचोळा गोळा करून जाळतात. जाळलेला पालापाचोळा न विझवता घरी निघून जातात. ही आग पसरत जाऊन अख्खे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. याशिवाय दुसरे कारण म्हणजे खरिपाचा हंगाम आटोपला की, शेतकरी शेत साफ करतात. यासाठी ते धुरे जाळतात. यामुळे शेतातील आग लगतच्या जंगलात पसरत जाऊन ती पुढे रुद्ररूप धारण करते. तसेच तेंदुपत्ता ठेकेदार मजुरांकरवी जंगलांना आगी लावण्याचे अघोरी काम करतात. तेंदूच्या झाडांना अधिक फुटवे यावे म्हणून हे काम केले जाते. आग लागली तर ती विशिष्ट अंतरापर्यंतच पसरत जाऊन थांबावी यासाठी फायर लाइन तयार केल्या जातात. पण रस्त्याच्या कडेची झाडे अनावश्यक तोडली जातात.

कोट

जंगलात वणवे लागू नये म्हणून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापासून जंगलातून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला फायर लाइन तयार केली जाते. विशेष म्हणजे, त्यात रस्त्याच्या कडेची केवळ खुरटी झाडे ताेडली जातात. फायर लाइनचा कचरा त्याच ठिकाणी गोळा करून जाळला जातो. त्यामुळे जंगलात कोणी बिडी, सिगारेट फेकून दिले तरी फायर लाइनमुळे जंगलात आग लागत नाही.

- मनोज चव्हाण

सहायक वनसंरक्षक, वनविभाग, वडसा